शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा आदेश : साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:34 IST

वर्धा रोडवरील साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. या कारवाईसाठी महानगरपालिकेला तीन दिवसाचा वेळ देण्यात आला.

ठळक मुद्देमनपाला दिला तीन दिवसाचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. या कारवाईसाठी महानगरपालिकेला तीन दिवसाचा वेळ देण्यात आला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ४ सप्टेंबर रोजी मनपाने मंदिर परिसरातील अवैध दुकाने जमीनदोस्त केली. त्यानंतर मंदिराचे अवैध बांधकाम वाचले होते. दरम्यान, पोलीस संरक्षण न मिळाल्यामुळे पुढील कारवाई होऊ शकली नाही. मनपाचे वकील अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिला. तसेच, मंदिर प्रशासनाने कारवाईत अडथळा निर्माण करू नये, असे सांगितले.अवैध दुकाने पाडण्यासाठी श्री साईबाबा सेवा मंडळाने याचिका दाखल केली होती. उद्देश पूर्ण झाल्यामुळे ही याचिका निकाली काढण्यात आली. अवैध दुकानदारांनी संरक्षण मिळण्यासाठी उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयालाही विनंती केली होती. परंतु, त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. त्यांना दुकानांवर कायदेशीर अधिकार सिद्ध करता आला नाही. मंडळातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.मोकळी जागा पार्किंगसाठी वापरणारदुकाने पाडल्यामुळे मोकळी झालेली जागा पार्किंगकरिता वापरण्यात येईल अशी ग्वाही श्री साईबाबा सेवा मंडळाने उच्च न्यायालयाला दिली. उच्च न्यायालयाने ही ग्वाही आदेशात नोंदवून मंडळाला यानुसार कृती करण्याचे निर्देश दिले. रोज शेकडो भाविक साई मंदिरात येतात. मंदिर परिसरात पार्किंगकरिता जागा उपलब्ध नसल्यामुळे भाविक रोडवर वाहने उभी ठेवत होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. वस्तीमधील नागरिक यामुळे त्रस्त झाले होते. अवैध दुकाने पाडल्यामुळे हा प्रश्न सुटणार आहे. मंदिराच्या मंजूर आराखड्यात ही जागा पार्किंगकरिताच आरक्षित आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTempleमंदिरEnchroachmentअतिक्रमण