शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : गुरुनानक शाळा प्रकरणात राज्य सरकारला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:56 IST

बेझनबाग येथील गुरुनानक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसंदर्भात विविध मागण्यांसह दाखल करण्यात आलेल्या दोन जनहित याचिकांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षणमंंत्री, नगर विकास विभागाचे सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती व शिख शिक्षण संस्था यांना नोटीस बजावून १४ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्दे१४ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बेझनबाग येथील गुरुनानक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसंदर्भात विविध मागण्यांसह दाखल करण्यात आलेल्या दोन जनहित याचिकांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शालेय शिक्षणमंंत्री, नगर विकास विभागाचे सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नागपूर सुधार प्रन्यास सभापती व शिख शिक्षण संस्था यांना नोटीस बजावून १४ ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पॅरेन्टस् स्टूडेन्टस् कृती समिती व इतर आणि गुरुनानक स्कूल स्टाफ असोसिएशन व इतरांनी या याचिका दाखल केल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण हक्क कायद्यानुसार शेजारच्या शाळांमध्ये स्थानांतरण होतपर्यंत गुरुनानक शाळा बंद करण्यात येऊ नये, विद्यार्थी स्थानांतरणाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास सरकारने शाळेचे व्यवस्थापन स्वत:च्या ताब्यात घ्यावे किंवा इतर संस्थेकडे सोपवावे, शिख शिक्षण संस्थेला सेल्फ फायनान्स स्कूल चालविण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासची जमीन लीजवर दिली जाऊ शकत नाही हे घोषित करण्यात यावे, विद्यार्थ्यांना विनाअनुदानित शाळेत स्थानांतरित करण्यात आल्यास सर्व खर्च सरकारने उचलावा आणि गुरुनानक शाळा बंद करण्याविषयी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात यावीत, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिलकुमार यांनी कामकाज पाहिले.विद्यार्थी व शिक्षकांचे नुकसानशिख शिक्षण संस्थेद्वारे संचालित आणि १९५६ मध्ये स्थापन झालेली ही शाळा अनुदानित शाळा होती. नागपूर सुधार प्रन्यासने दिलेल्या जमिनीवर शाळेची इमारत व अन्य सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. परंतु, शिख शिक्षण संस्थेद्वारे विविध कारणांमुळे ही शाळा महाराष्ट्र सेल्फ फायनान्स स्कूल (एस्टॅब्लिशमेन्ट अ‍ॅण्ड रेग्युलेशन) अ‍ॅक्ट-२००२ अंतर्गत संचालित केली जाणार आहे. त्यामुळे शाळेतील सुमारे २५०० विद्यार्थ्यांचे स्थानांतरण व शिक्षकांचे समायोजन करावे लागणार आहे. शाळेत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अनुदानित शाळा तात्काळ बंद केल्यास विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही नुकसान होईल. करिता सर्वांच्या हिताची काळजी घेतल्याशिवाय शाळा बंद करण्यात येऊ नये, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा