शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घटस्फोटप्रकरणी पत्नीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग उपलब्ध करून देण्याची उच्च न्यायालयाची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:02 IST

घटस्फोटासाठी दाखल एका प्रकरणामध्ये संबंधित दाम्पत्याला नागपूर व पुणे कुटुंब न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

ठळक मुद्देकोर्टाच्या तारखांसाठी वारंवार येणे शक्य नव्हते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार

आॅनलाईन लोकमतनागपूर : घटस्फोटासाठी दाखल एका प्रकरणामध्ये संबंधित दाम्पत्याला नागपूर व पुणे कुटुंब न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे.प्रकरणातील पती संकेतने घटस्फोटासाठी नागपूर कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पत्नी प्रियंका संकेतपासून विभक्त झाल्यानंतर पुणे येथे राहात आहे. त्यामुळे तिला या प्रकरणासाठी वारंवार नागपुरात येणे त्रासदायक ठरत आहे.परिणामी, तिने हे प्रकरण पुणे कुटुंब न्यायालयात स्थानांतरित करण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार अशा प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांची सुविधा अबाधित राखणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने संकेत व प्रियंकाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधेचा उपयोग करण्याची सूचना केली आहे. तसेच, नागपूर व पुणे कुटुंब न्यायालयाने त्यांना ही सुविधा उपलब्ध करून द्यावी असा आदेश दिला आहे. यावर येणारा खर्च संकेतने करावा असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.दोन्ही पक्षकारांना येत्या ११ डिसेंबर रोजी संबंधित कुटुंब न्यायालयात हजर होण्यास सांगण्यात आले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे निरीक्षण करण्यासाठी दोन्ही कुटुंब न्यायालयाने सुनावणीदरम्यान सक्षम अधिकारी उपस्थित ठेवावा व त्या अधिकाºयांनी पुढील तारखेस यासंदर्भात आपापला स्वतंत्र अहवाल सादर करावा.तसेच, ही सुविधा किती सुविधाजनक व उपयोगी आहे याचा अनुभव दोन्ही पक्षकारांनी सांगावा असेही उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. पत्नीतर्फे अ‍ॅड. अंकिता सरकार तर, पतीतर्फे अ‍ॅड. मसुद शरीफ व अ‍ॅड. आदिल मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयDivorceघटस्फोट