शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्याने डॉक्टरला फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 22:01 IST

गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली.

ठळक मुद्देमहान व्यवसाय असल्याने दावा खर्च बसवला नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुणवत्ताहीन याचिका दाखल केल्यामुळे धरमपेठ येथील डॉ. गगन जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फटकारले. तसेच, त्यांची याचिका फेटाळून लावली.डॉ. जैन यांना कायद्यातील तरतुदींची माहिती होती. असे असताना त्यांनी केवळ नशीब अजमावण्याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रयत्नाची कधीच प्रशंसा केली जाऊ शकत नाही. या याचिकेमुळे न्यायालयाचा वेळ व्यर्थ गेला. परंतु, डॉ. जैन हे महान व्यवसायाशी जुळलेले असल्यामुळे त्यांच्यावर दावा खर्च बसवणे टाळत आहोत. त्यांनी यातून धडा घेऊन भविष्यात कायद्याचा उचित सन्मान करावा, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व नितीन सूर्यवंशी यांनी या प्रकरणावर निर्णय दिला.डॉ. जैन यांनी धरमपेठ येथील एका इमारतीच्या तळमाळ्यावर दंत रुग्णालय सुरू केले होते. त्यामुळे त्या जागेचा उपयोग बदलला गेला. परिणामी, महानगरपालिकेने त्यांना १ फेब्रुवारी २०२० रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीसला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या दंत रुग्णालयाला ९ मार्च २०२० रोजी परवानगी दिली आहे. त्यामुळे वादग्रस्त नोटीस अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने त्यावर उत्तर सादर करून आरोग्य अधिकाऱ्याला उपयोग बदलाची परवानगी देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच, डॉ. जैन यांनी संबंधित जागेचा उपयोग बदलण्याची परवानगी मिळविण्यासाठी ९ मार्च रोजी सादर केलेला अर्ज १९ मार्च रोजी फेटाळण्यात आल्याची माहिती दिली. उच्च न्यायालयाने हे मुद्दे लक्षात घेता याचिका गुणवत्ताहीन ठरवून खारीज केली. महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर