शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हायकोर्ट : रेशन कार्ड नसल्यास एलपीजी कनेक्शन देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 23:14 IST

घरात एलपीजी सिलिंडर असतानाही राज्यातील हजारो कुटुंबे रेशन कार्डवरून रॉकेल उचलत आहेत. अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलिंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग नसल्यामुळे हा गैरप्रकार होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार रेशन कार्ड स्टॅम्पिंग करीत आहे. परंतु, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यात आणखी नवीन ग्राहकांची भर पडू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी यापुढे रेशनकार्ड नसल्यास कुणालाही नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये, असा आदेश केंद्र सरकारला दिला.

ठळक मुद्देअवैधपणे रॉकेल मिळविण्याचा मार्ग बंद करणारा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात एलपीजी सिलिंडर असतानाही राज्यातील हजारो कुटुंबे रेशन कार्डवरून रॉकेल उचलत आहेत. अशा कुटुंबांकडील रेशन कार्डवर ते एलपीजी सिलिंडरधारक असल्याची स्टॅम्पिंग नसल्यामुळे हा गैरप्रकार होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकार रेशन कार्ड स्टॅम्पिंग करीत आहे. परंतु, हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यात आणखी नवीन ग्राहकांची भर पडू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी यापुढे रेशनकार्ड नसल्यास कुणालाही नवीन एलपीजी कनेक्शन देऊ नये, असा आदेश केंद्र सरकारला दिला.या आदेशानुसार, नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकाला रेशन कार्ड सादर करणे अनिवार्य झाले आहे. एलपीजी कनेक्शन मंजूर झाल्यानंतर त्याच ठिकाणी रेशन कार्डवर स्टॅम्पिंग केले जाईल. त्यामुळे संबंधित ग्राहकाला त्या रेशन कार्डचा वापर करून रॉकेल उचलता येणार नाही. परिणामी, अवैधपणे रॉकेल मिळविण्याचा मार्ग बंद होऊन वाचणारे रॉकेल गरजू व्यक्तींना वाटप करता येईल. पेट्रोलियम कंपन्यांच्या माहितीनुसार, राज्यात १ कोटी १५ लाखावर कुटुंबांकडे एक सिलिंडर तर, १ कोटी १७ लाखावर कुटुंबांकडे दोन सिलिंडर आहेत. त्यांची एकूण संख्या २ कोटी ३२ लाखावर आहे. परंतु, राज्य सरकारने आतापर्यंत केवळ १ कोटी ५२ हजार रेशन कार्डस्वर एलपीजीधारकाचे स्टॅम्पिंग केले आहे. जानेवारी-२०१७ पर्यंत १ कोटी ४२ लाख रेशन कार्डस्वर स्टॅम्पिंग करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यात केवळ १० लाखांची भर पडली आहे. हे काम असेच संथगतीने सुरू राहिल्यास गरजू नागरिकांना त्यांचा अधिकार मिळविण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागू शकते, हा मुद्दा उच्च न्यायालयाने सदर आदेश देताना लक्षात घेतला. एलपीजी कनेक्शन देतानाच रेशन कार्ड स्टॅम्पिंग केल्यास पुढील सर्व प्रश्न आपोआपच संपणार आहेत. आता केवळ आधीच्या एलपीजी कनेक्शनधारकांचे रेशन कार्डस् स्टॅम्पिंग करण्याचे काम तातडीने पूर्ण करावे लागणार आहे.यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते कडूजी पुंड यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. गरजू व्यक्तींना पुरेसे रॉकेल मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.राज्याला किती रॉकेल देता?राज्यामध्ये सध्या एका व्यक्तीला एक महिन्यामध्ये केवळ एक लिटर रॉकेल वितरित केले जात असल्याची माहिती अ‍ॅड. मिर्झा यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला दिली. ही बाब लक्षात घेता, न्यायालयाने राज्य सरकारला रॉकेलचा किती कोटा दिला जातो, अशी विचारणा केंद्र सरकारला करून, यावर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.एक सिलिंडरधारकांचा मध्यस्थी अर्जएक एलपीजी सिलिंडर असलेल्या काही नागरिकांनी या प्रकरणात मध्यस्थी अर्ज दाखल केला. दुसरे सिलिंडर नसल्यामुळे घरातील एकमेव सिलिंडर संपल्यास नवीन सिलिंडर मिळण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागते. या दिवसांमध्ये रॉकेल वापरून आवश्यक कामे केली जातात. परिणामी, एक सिलिंडर असणाऱ्यांना रॉकेलसाठी अपात्र ठरविल्यास त्यांनी संबंधित दिवसांमध्ये काय करावे, असा प्रश्न न्यायालयासमक्ष उपस्थित करण्यात आला. न्यायालयाने राज्य सरकारला यावर पुढच्या तारखेला भूमिका मांडण्यास सांगितले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार