शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

हायकोर्ट : धवड दाम्पत्याला तात्पुरता जामीन नाकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 8:53 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांना नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. अशोक धवड बँकेचे अध्यक्ष तर, किरण धवड संचालिका आहेत.

ठळक मुद्देसरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांना नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. अशोक धवडबँकेचे अध्यक्ष तर, किरण धवड संचालिका आहेत.धवड दाम्पत्याचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही. ते तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करतील. तसेच, कायद्याच्या चौकटीत राहतील. त्यामुळे त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. राज्य सरकारने ही विनंती मान्य करण्यास विरोध केला. प्रकरणाचा महत्त्वपूर्ण तपास अद्याप बाकी आहे. त्याकरिता धवड दाम्पत्याला ताब्यात घेणे आवश्यक आहे असे सरकारने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता धवड दाम्पत्याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करता येणार नाही असे स्पष्ट केले. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून धवड दाम्पत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २३ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. अर्जावर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमक्ष सुनावणी झाली.एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने काही दिवसांपूर्वी धवड दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून ४ कोटी ३ लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्राच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखवण्यात आले होते. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. उच्च न्यायालयात धवड दाम्पत्यातर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे व अ‍ॅड. झीशान हक तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbankबँकfraudधोकेबाजीAshok Dhawadअशोक धवड