शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

हायकोर्ट : केंद्रीय सांस्कृतिक सचिवांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:36 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अवमानना प्रकरणामध्ये केंद्रीय सांस्कृतिक सचिव व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे तत्कालीन संचालकांना फटकारले. सदर प्रकरणात आवश्यक वेळ देऊनही उत्तर दाखल न केल्यामुळे या अधिकाऱ्यांना हा दणका बसला. त्यानंतर त्यांना उत्तर दाखल करण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली.

ठळक मुद्देअवमानना प्रकरणात उत्तर दाखल केले नाही

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका अवमानना प्रकरणामध्ये केंद्रीय सांस्कृतिक सचिव व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे तत्कालीन संचालकांना फटकारले. सदर प्रकरणात आवश्यक वेळ देऊनही उत्तर दाखल न केल्यामुळे या अधिकाऱ्यांना हा दणका बसला. त्यानंतर त्यांना उत्तर दाखल करण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आर्थिक गैरव्यवहारासाठी दोषी ठरवून १० डिसेंबर २०१३ रोजी बडतर्फ करण्यात आलेले सहायक संचालक रवींद्र दुरुगकर यांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. बडतर्फ होण्यापूर्वी त्यांनी वेतनाच्या मुद्यावरून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. २२ डिसेंबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने त्यांना तीन महिन्यांत नियमानुसार वेतन देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाचे पालन झाले नाही असे दुरुगकर यांचे म्हणणे आहे.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये दुरुगकर यांना २४ डिसेंबर २०१२ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर त्यांनी ३१ डिसेंबर २०१२ रोजी उत्तर दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आले. त्याविरुद्ध कार्यकारी मंडळाचे अध्यक्षांकडे अपील करूनही काहीच फायदा झाला नाही. चौकशी अधिकाºयाने १३ नोव्हेंबर २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्या आधारावर त्यांना बडतर्फ करण्यात आले. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcultureसांस्कृतिक