शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनामुळे नागपुरातील प्राणीसंग्रहालयांना हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 21:33 IST

राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये असणाऱ्या प्राण्यांना विषाणूंची बाधा होऊ नये म्हणून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने अतिदक्षतेचा इशारा दिला असून, सुरक्षेसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. नागपुरातील गोरेवाडा आणि महाराजबाज प्राणिसंग्रहालयांनाही सूचना मिळाल्या असून, खबरदारी घेण्यासाठी कळविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यूयॉर्क मधीलब्रोन्क्स प्राणिसंग्रहालयातील वाघिण कोरोनाबाधित झाल्याच्या वृत्ताने देशभारतील प्राणिसंग्रहालयामध्ये खळबळ उडाली आहे. राज्यातील प्राणिसंग्रहालयांमध्ये असणाऱ्या प्राण्यांना विषाणूंची बाधा होऊ नये म्हणून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने अतिदक्षतेचा इशारा दिला असून, सुरक्षेसाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. नागपुरातील गोरेवाडा आणि महाराजबाज प्राणिसंग्रहालयांनाही सूचना मिळाल्या असून, खबरदारी घेण्यासाठी कळविले आहे.महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालयाचे सदस्य सचिव तथा मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्राणिसंग्रहालये आणि वन्यप्राणी बचाव केंद्रांना पत्र पाठवून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राणिसंग्रहालय ज्या प्राधिकरणांतर्गत येत असेल त्यांच्याशी संपर्क साधून तातडीने सॅनिटाईझ करण्याचे कळविले आहे. आवश्यक्ता भासल्यास प्राण्यांचे विलगीकरण करण्याच्या आणि प्रकल्पांमध्ये सेवा देणाºया सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत.प्राण्यांना संसर्ग झाला अथवा नाही हे तपासण्यासाठी प्राधिकरणाने कळविले आहे. त्यानुसार, प्राण्यांच्या स्रावांचे नमुने गोळा करून ते तपासण्याच्या सूचना गोवेकर यांनी दिल्या आहेत. प्राणिसंग्रहालय किंवा बचाव केंद्रामध्ये कमीतकमी मनुष्यबळ वगळता मानवी वावर वाढू न देण्यासाठी बजावले आहे.नागपुरातील महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची देखरेख, पिंजºयांची स्वच्छता व भोजन व्यवस्थेसाठी मोजका स्टाफ कार्यरत आहे. येथील प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार,वन्यप्राण्यांच्या देखरेखीसाठी व स्वच्छतेसाठी २५ कर्मचारी असतात. मात्र कोरोनासंदर्भात आलेल्या सूचनानुसार, सध्या नऊ कर्मचारीपिंजºयांची स्वच्छता आणि भोजनाच्या सेवेत आहेत. या कर्मचाºयांना अस्थायी ओळखपत्र दिले असून, प्राण्यांसाठी खाद्य आणणाºया वाहनांवर अत्यावश्यक सेवेचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेस्क्यू सेंटरमधील गार्ड आणि जू-कीपरच्या १० कुटुंबांसाठी सेंटरमधील क्वॉर्टरमध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यांना बाहेर जाण्यास परवानगी नाही. तसेच प्राण्यांची प्रकृती तपासण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची चमू तैनात आहे. सोमवारी सूचना येताच सर्व डॉक्टरांची बैठक घेऊन खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या. वन्यप्राण्यांचे भोजनही गेटवरूनच घेतले जात आहे.गरज पडल्यास सीसीटीव्हीतून निगराणीमहाराजबाग आणि गोरेवाडा व्यवस्थापनाने वन्यप्राण्यांची देखरेख करणाºया कर्मचाºयांना अंतर राखून काम करण्यास सुचविले आहे.रखवालदार आणि अन्य सर्व कर्मचाºयांना मास्क आणि हॅन्डग्लोव्हज् वापरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या असून, आवश्यक्ता पडल्यास वन्यप्राण्यांची २४ तास सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी करण्यासाठी कळविले आहे.वन्यप्राणी आणि संख्या

वन्यप्राणी                 गोरेवाडा              महाराजबागवाघ                              ८                            १बिबट                           २४                          ५अस्वल                          १०                          ५हरीण                            ४०                          -कोल्हा                              -                           १मगर                              -                               १इमू                                 -                             ५उदमांजर                        -                                ३ 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूर