शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले
2
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
3
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेणार...
4
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
5
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
6
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
8
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
9
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
10
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
11
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
12
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
13
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
14
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
15
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?

प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला हेरिटेज कस्तुरचंद पार्कचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:00 AM

कस्तुरचंद पार्क मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.

राकेश घानोडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रानगरीच्या हृदयस्थळी असलेल्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाचा गौरव प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हरवला आहे. प्रशासनाने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रावर दिलेल्या माहितीच्या उलट परिस्थिती मैदानावर आहे. मैदान व मैदानाच्या मध्यभागी असलेले स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे, असे परखड ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांनी ओढले.

या न्यायमूर्तींनी ५ सप्टेंबर रोजी कस्तुरचंद पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, आढळून आलेली दुरवस्था त्यांनी या प्रकरणावरील आदेशात नोंदवून प्रशासनाची कानउघाडणी केली. महान दानशूर जमीनदार सर दिवान बहादूर सेठ कस्तुरचंद डागा यांनी ही जमीन खेळांकरिता दान केली होती. शहराच्या विकास आराखड्यात ही जमीन हिरव्या रंगात दर्शविण्यात आली आहे. तसेच, या मैदानाला ग्रेड-१ हेरिटेजचा दर्जा देण्यात आला आहे. असे असताना प्रशासनाने मैदानाचा गौरव जपला नाही. त्यामुळे मैदानाची वाईट अवस्था झाली आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले.मैदानाची दुरवस्था पाहून न्यायालयाने एप्रिल-२०१७ पासून वेळोवेळी आवश्यक आदेश दिले. परंतु, प्रशासनाने आदेशांची गांभीर्याने अंमलबजावणी केली नाही. विविध विकास कामांमुळे मैदानावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. संपूर्ण मैदान ओबडधोबड झाले आहे. मैदानावर व्यवस्थित चालता येत नाही. त्यामुळे खेळाचा विचार करता येत नाही. मैदानाचे ९० टक्के समतलीकरण झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला होता. परंतु, त्यात तथ्य आढळून आले नाही. वॉकिंग, जॉगिंग व सायकल ट्रॅक आणि वृक्षारोपणाचे काम अपूर्ण आहे. मैदानाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. अतिक्रमण व मातीगोट्याचे ढिगारे हटविण्याशिवाय दुसरे कोणतेच ठोस काम झाले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.आदेशातील इतर निरीक्षणे१ - कस्तुरचंद पार्कचा उपयोग मुंबईतील ओव्हल मैदानासारखा झाला पाहिजे. त्यासाठी कस्तुरचंद पार्कचा गौरव परत आणणे आवश्यक आहे. तसेच, सामान्य नागरिकांना या मैदानावर खेळता आले पाहिजे.२ - मैदानावरील खोदकामात ऐतिहासिक तोफ आढळून आल्या. परंतु, जनतेला ऐतिहासिक मूल्ये व भव्यता दाखविण्यासाठी त्या तोफ मैदानावर प्रदर्शित करण्यात आल्या नाहीत.३ - स्वच्छतागृहे, प्रवेशद्वार, ड्रेनेज लाईन इत्यादी कामे अर्धवट आहेत. ४ कोटी ५२ लाख रुपये निधीतून ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा चुकीचा आहे.४ - मैदानावरील स्मारकाला जागोजागी भेगा पडल्या आहेत. बांधकाम फुटले आहे. खिटक्या तुटल्या आहेत. स्मारकाचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट झाले नाही. स्मारक जीर्ण होत आहे.

 

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्क