शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

देशभरात हेरिटेज व जेनेटिक स्कील मॅपिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:46 IST

देशात अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने विविध कला व लघु उद्योग केले जातात. या कला त्यांना कुणी शिकवलेल्या नाहीत. त्या परंपरेने त्यांनी आत्मसात केल्या. त्यात कौशल्य प्राप्त केले.

ठळक मुद्देकेंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे : ‘हुनर खोज यात्रा’चे उद््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात अनेक वर्षांपासून परंपरागत पद्धतीने विविध कला व लघु उद्योग केले जातात. या कला त्यांना कुणी शिकवलेल्या नाहीत. त्या परंपरेने त्यांनी आत्मसात केल्या. त्यात कौशल्य प्राप्त केले. परंतु त्या उद्योगांना व ते करणाºया कारागिरांना अजूनही प्रतिष्ठा मिळू शकलेली नाही. त्यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून अशा कला व कारागिरांना शोधण्यासाठी केंद्र सरकार हेरिटेज (वारसा कौशल्य) व जेनेटिक (आनुवंशिक) स्कील मॅपिंग करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी येथे केले.ग्राम ज्ञानपीठ, संपूर्ण बांबू केंद्र, राष्ट्रीय कारीगर पंचायत आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात तीन दिवसीय ‘हुनर खोज यात्रा संवाद व प्रस्तुतीकरण’ आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कारीगर पंचायतचे अध्यक्ष महेश शर्मा होते. व्यासपीठावर आयोजक समितीच्या अध्यक्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस, खा. डॉ. विकास महात्मे, किसनलाल गामित, आनंदवल्लभ जोशी, सुनील देशपांडे, मौली कौशल प्रामुख्याने उपस्थित होते.केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर आम्ही ज्या गतीने विकास करीत आहोत, ते केवळ जगातील दुसºया राष्ट्रांची ‘कॉपी’ करण्याचा प्रयत्न आहे. एक काळ असा होता की, संपूर्ण जगातून लोक शिकण्यासाठी भारतात येत असत. परंतु आज भारतातील तरुणांना शिकण्यासाठी दुसºया देशात जावे लागते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. शून्यचा शोध भारतात लागला. तो केवळ असाच लागलेला नाही. त्यामागे सपूर्ण तत्त्वज्ञान आहे. जिथून सुरुवात तिथेच शेवट. हे शून्य सांगते, हेच खरे भारतीय तत्त्वज्ञान आहे. आपल्या देशात अनेक वर्षांपासून विविध परंपरागत व्यवसाय केले जातात. काही व्यवसाय तर विशिष्ट समुदायामध्ये किंवा जनजातीच करतात. त्यांना ती कला कुणीही शिकवत नाही. ते परंपरेने शिकतात. अशा लोकांना शोधून त्यांना नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. हजारो वर्षांचा हा वारसा असून त्याला जिवंत ठेवायचे आहे, बळ द्यायचे आहे. कौशल्य विकास विभागातर्फे तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा कारागिरांना शोधून, त्यांची नोंदणी करून त्यांना आरपीएल सर्टिफिकेट दिले जाईल. तसेच त्यांना नवीन पिढीला प्रशिक्षण दिले जाईल. यातून अशा कलांना बळ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.अध्यक्षीय भाषणात महेश शर्मा यांनी कारागिरांना सन्मान द्या कमीतकमी त्यांना मान्यता तरी द्या, असे आवाहन केले. शोभाताई फडणवीस यांनी स्वागतपर भाषण केले. खा. विकास महात्मे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सुनील देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. इंद्रायणी शेंबेकर यांनी केले. आशिष गुप्ता यांनी आभार मानले.तीन दिवस चिंतन८ आॅक्टोबर दरम्यान चालणाºया या ‘हुनर खोज यात्रा संवाद’ कार्यक्रमात १८ राज्यातील कारागीर सहभागी झाले आहेत. तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात विविध विषयावर मंथन केले जाईल. कारागिरांसाठी कोणते धोरण असावे, यावर चर्चा होईल. वसंतराव देशपांडे परिसरातच एक प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटनही शुक्रवारी आ. अनिल सोले व रुकशद भगवाघर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यानंतर राष्ट्रीय कारागीर पंचायत : भूमिका व उद्देश यावर चर्चा करण्यात आली. ७ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता ग्राम ज्ञानपीठद्वारे विद्यार्थ्यांची समूह चर्चा होईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होईल. ८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, महापौर नंदा जिचकार यांच्या उपस्थितीत समारोप होईल.