शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मेयोमध्ये मिळाल्या मिळाल्या गांजाच्या पुड्या, दारूच्या बॉटल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 21:46 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ) जवानांनी गुरुवारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली. यावेळी चक्क गांजा पुड्या, देशी दारूच्या बॉटल्स, १५० वर गुटखाच्या पुड्या, बीडी व सिगारेटचे पॅकेट्स आढळून आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देरुग्णांच्या नातेवाईकांची झाडाझडती : ‘एमएसएफ’च्या जवांनाची आकस्मिक तपासणी मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) महाराष्ट्र सुरक्षा बलच्या (एमएसएफ) जवानांनी गुरुवारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी केली. यावेळी चक्क गांजा पुड्या, देशी दारूच्या बॉटल्स, १५० वर गुटखाच्या पुड्या, बीडी व सिगारेटचे पॅकेट्स आढळून आल्याने खळबळ उडाली. नातेवाईक रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी येतात, की व्यसन करण्यासाठी येतात, असा प्रश्न या कारवाईतून उपस्थित केला जात आहे.मेयो रुग्णालयाचा परिसर मोठा आहे. शिवाय, इमारतही विखुरल्या आहेत. याचा फायदा समाजविघातक घेतात. रुग्ण किंवा त्याच्या नातेवाईकांची लुबाडणूकीचे प्रमाणही मोठे आहे. मेयोच्या ‘एमएसएफ’च्या जवानांमुळे यावर काही प्रमाणात वचक बसला आहे. याचा फायदा होतानाही दिसून येत आहे. यातच एक पाऊल पुढे टाकत, २६ सप्टेंबररोजी ‘एमएसएफ’चे वरीष्ठ सुरक्षा निरीक्षक रमेश तायडे यांच्या नेतृत्वात सर्जिकल कॉम्प्लेक्सयेथे दुपारी अचानक रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणी करण्यात आली. यात एकाकडून गांजाची पुडी आढळून आली. चौघांकडून देशी दारुच्या बॉटल्स मिळाल्या. १५० गुटखाच्या पुड्या, सिगारेट व बिडीचे पॅकेट्सही आढळून आले. या सर्व नातेवाईकांना समज देऊन सोडण्यात आले. ही कारवाई भोईरे, कोपले, ओमप्रकाश, विकास, निर्मला महाजन, इंगळे व दरोटे यांनी केली. ‘लोकमत’शी बोलताना तायडे म्हणाले, रुग्णांच्या सुरक्षितेसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही तपासणी रुग्णालयाच्या परिसरात कधीही व कुठेही होईल. यानंतर अमली पदार्थ बाळगणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना पोलिसांच्या हवाली केले जाईल.रुग्णालयाच्या पानठेल्यांचे अतिक्रमणरुग्णालयाच्या आत पानठेल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना सहज गुटखा पुड्यांपासून ते बिड्यापर्यंतचे साहित्य उपलब्ध होते. विशेष म्हणजे, डॉ. प्रकाश वाकोडे अधिष्ठाता असताना त्यांनी मनपाच्यामदतीने अतिक्रमण हटविले होते. त्यांनंतर अतिक्रमणाची कारवाईच झाली नसल्याचे बोलले जाते.धक्कादायक प्रकाररुग्णांची सश्रृषा करण्यासाठी येणाऱ्या  रुग्णांच्या नातेवाईकांकडून अमली पदार्थ मिळणे हा धक्कादायक प्रकार आहे. रुग्णांच्या सुरक्षितेसाठी आता या पुढे ही तपासणी मोहीम वारंवार राबविली जाईल. ‘एमएसएफ’च्या जवानांनी चांगले काम केले आहे.डॉ. सागर पांडेवैद्यकीय उपअधिक्षक, मेयो

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीindira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)