शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात डिजिटल व्यवहारासाठी ‘सखी’ची मदत!

By गणेश हुड | Updated: June 7, 2023 15:15 IST

बँकात येण्याचा त्रास वाचला : रोजगारही उपलब्ध झाला

नागपूर : ग्रामीण भागात बँकांची सुविधा पोहचावी. लोकांना आर्थिक व्यवहार करता यावे. व्यवहार करताना घ्यावयाची काळजी जीवन सुरक्षा विमा, अटल पेन्शन योजना यासह विविध योजनांचा लाभ गरजुंना मिळावा. डिजिटल व्यवहार करता यावे, यासाठी उमेदच्या बी.सी. सखींनी मदतीचा हात पुढे केला आहे.

देशातील प्रत्येक नागरिक आर्थिक व्यवहारात डिजिटल साक्षर झाला पाहिजे यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतगर्त बँक करस्पोंडन्स सखीच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता मोहीम राबविली जात आहे.ग्रामविकास विभागाने १ फेब्रुवारी ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान डिजिटल साक्षरता मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात उमेद अभियानाच्या माध्यमातून ५१ बँक करस्पोंडन्स सखी आणि इंडिया पोस्ट बँक करिता ८६ बँक करस्पोंडन्स सखी सध्या जिल्यात कार्यरत आहेत. त्यांच्या ध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला डिजिटल साक्षर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आजवर जिल्ह्यात ८६ जनजागृतीचे मेळावे यशस्वी केले आहेत. यात उमेद अभियानातील बँक करस्पोंडन्स सखी, बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी यांच्या मदतीने आर्थिक व्यवहार करतांना घ्यावयाची काळजी, व्यक्तिगत बँक माहिती बाबतची सजगता, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा व अटल पेन्शन योजना यांचे महत्व सांगून विमा काढण्याचे फायदे लाभ आणि वार्षिक प्रीमियम याविषयी माहिती दिली.

बँकात येण्याचा त्रास वाचला

ग्रामीण भागातील विधवा, एकल, परितक्त्या महिला, वयोवृद्ध महिला पुरुष, अपंग यांना दिला जाणारा मासिक प्रोत्साहन पर भत्ता गावोगावी जाऊन काढून देतात. किंवा आपल्या सेंटरवरून काढून देतात. यामुळे ग्रामीण भागातील अशा नागरिकांना बँकेत येण्याचा त्रास कमी होतो.

 सखींना रोजगार उपलब्ध झाला

ज्याठिकाणी बँक करस्पोंडन्स सखी करिता रिक्त जागा असेल अशा ठिकाणी काम करण्यास इच्छुक पात्र महिलेला रोजगाराची संधी निर्माण करून दिली जाते. ज्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयं रोजगार मिळतो, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य होते, मुलांच्या शिक्षणासाठी वेळेवर सहाय्य करता येते. उभेद अभियानाच्या अशा या महत्वकांक्षी उद्देशाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा तथा तालुक्यातील सर्व कर्मचारी सहभागी आहेत.

टॅग्स :SocialसामाजिकBanking Sectorबँकिंग क्षेत्रnagpurनागपूर