शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या भागातूनच गरजूंची मदत करा : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:23 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेदेखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गरजूंच्या मदतीसाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, भाजपचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व विधानसभा प्रभारींशी संवाद साधला.

ठळक मुद्देराज्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष, महापौर, जि.प. अध्यक्ष, विधानसभा प्रभारींशी संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भाजपातर्फेदेखील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गरजूंच्या मदतीसाठी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भातच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, भाजपचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष व विधानसभा प्रभारींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संबंधित जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी आहे तेथेच राहून गरजूंना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ आहे. यामुळे खासगी आस्थापनांसह विविध कामेदेखील बंद आहेत. अनेक मजूर तसेच गावातील नागरिक परत जात आहेत. शिवाय हातावर पोट असलेल्यांसमोर मोठी अडचण उभी ठाकली आहे. अशा लोकांना तातडीने मदत करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सूचना केली. भाजपातर्फे हाती घेण्यात आलेले सेवाकार्य आता तालुका पातळीपर्यंत नेण्यात येणार आहे. अनेक उपक्रम ठिकठिकाणी हाती घेण्यात आले आहेत. घरपोच औषध, रक्तदानाच्या उपक्रमात सहभाग, जिल्ह्यांच्या स्वतंत्र हेल्पलाईन, मास्क वितरण असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.वर्ध्यातील शेतकरी समस्या सरकारपर्यंत पोहोचवूया संवादादरम्यान वर्धा जिल्ह्यातील शेतमालाच्या खरेदीचा मुद्दा चर्चेत आला. वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेतमाल नाफेड खरेदी करायला तयार आहे. पण, त्या खरेदीवर बंदी टाकण्यात आली आहे, याकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. हा विषय सरकारच्या कानावर घालण्यात येईल, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर