शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची मागणी

By गणेश हुड | Updated: October 5, 2023 13:37 IST

जिल्ह्यातील ४०४ गावांतील १२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तसेच ग्रामीण भागातील घरे, रस्ते, पाणंद रस्ते, पूल, पाळीव जनावरांचे मोठे नुकसान

नागपूर : २० सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील ४०४ गावांतील १२ हजार ७४४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे तसेच ग्रामीण भागातील घरे, रस्ते, पाणंद रस्ते, पूल, पाळीव जनावरांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे सरसकट पंचनामे करून या शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावीत. सरसकट पंचनामे करून संकटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी. अशी मागणी जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिलेल्या निवेदनातून केली.

माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, सभापती प्रवीण जोध, अवंतिका लेकुरवाळे, राजकुमार कुसुंबे, मिलिंद सुटे, सदस्य रश्मी बर्वे, सदस्य, समीर उमप, महेंदूर डोंगरे, देवानंद कोहळे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सदस्य प्रकाश खापरे, शांता कुमरे, दुधराम सव्वालाखे, प्रकाश नागपुरे, दिनेश बंग, उज्ज्वला बोढारे, अरुण हटवार, शंकर डडमल, पं.स.सभापती महेंद्र गजबे, निशिकांत नागमोते, श्रावण भिंगारे, राहुल तिवारी,मंगला निबोने, स्वप्नील श्रावणकर, दीक्षा चनाकापुरे, रुपाली मनोहर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्यावर संबंधित गावाच्या सरपंचाची स्वाक्षरी नुकसानग्रस्ताच्या यादीत समावेश करावी तसेच कीड व रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी शिष्टमंडळाने केली.

बाह्ययंत्रणेची सेवा बंद करा

जिल्हा परिषदेसह शासकीय कार्यालयात बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून कामे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे बेरोजगार युवकांवर अन्याय होत असल्याने बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून सेवा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा. जि.प.व शासकीय कार्यालयातील रिक्त पदे नियमित भरतीतून भरण्यात यावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. जि.प.च्या स्थायी समितीनेही याबाबतचा ठराव शासनाकडे पाठविला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र