शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट, तरीही या कारणाने होतोय दुचाकीस्वारांनाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 20:00 IST

मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु अनेक दुचाकीस्वार याला गंभीरतेने घेत नाही. केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बोगस हेल्मेटचा वापर करतात.

ठळक मुद्दे निकृष्ट दर्जाच्या हेल्मेटचा वापर वाढला : कवच आणि आतील खिळेच ठरतात धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोटारसायकल चालकाच्या डोक्याच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे हेल्मेट हे व्यक्तिगत सुरक्षेसाठीचे एक महत्त्वाचे साधन आहे. परंतु अनेक दुचाकीस्वार याला गंभीरतेने घेत नाही. केवळ पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी बोगस हेल्मेटचा वापर करतात. अपघात झाल्यास हेच हेल्मेट त्यांच्यासाठी धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करताना बोगस हेल्मेटवरही कारवाई करावी, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रस्त्यावर वर्दळीचे प्रमाण कमी आहे. परिणामी, अपघातांची संख्या कमी झाली असलीतरी ती थांबलेली नाही. तज्ज्ञाच्या मते, बनावट हेल्मेट अधिक धोकादायक ठरते. दुचाकीचा अपघात होऊन आपले डोके एखाद्या कठीण पृष्ठभागावर आदळते, तेव्हा अगदी सेकंदभरात डोके काम करेनासे होते. ताशी १० ते १०० कि.मी. वेगाने मोटारबाईक चालविणाऱ्याला होणाऱ्या अपघातात ही प्रक्रिया हानिकारक ठरते. २०० कि.मी. वेगाने जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होतो तेव्हा निर्माण होणारा आघात ५०००० न्यूटन मापाच्या बलाइतका प्रचंड असतो. या आघाताने कवटीला चिरा जाणे, मेंदूत रक्तस्राव, मेंदूला धक्का, मुका मार; अशा इजा होतात. अशावेळी डोक्यावर असलेले हेल्मेट हा आघात शोषून डोक्याचे रक्षण करण्याचे कार्य करते, परंतु हेच जर हेल्मेट निकृष्ट दर्जाचे असेल तर ते तुटून जखमांमध्ये वाढ करण्यास मदत करते.दर्जेदार हेल्मेटच का?हेल्मेटची निर्मिती व रचना ही अपघातात सापडलेल्या मृतदेहाचा सविस्तर अभ्यास, जखमींची तपासणी, प्राण्यावरचे प्रयोग, बायोमेडिकल सर्वेक्षण, संगणकाच्या साहाय्याने तयार केलेला डेटा; यातून निघालेल्या निष्कर्षातून ठरविण्यात आलेले आहे. दर्जेदार हेल्मेट तयार करताना, त्याला हेल्मेटच्या आत असलेल्या मऊ थराची आघात शोषून घेण्याची क्षमता, तीव्रता किंवा तीक्ष्णता बोथट करण्याची क्षमता, हेल्मेट डोक्यापासून अलग होऊ नये यासाठी मजबूत पट्ट्या आणि हेल्मेटच्या कवचाच्या कणखरतेकडे विशेष लक्ष दिले जाते.स्वस्त मिळते म्हणून हेल्मेट घेऊ नकारस्त्यावरचे हेल्मेट स्वस्त मिळते म्हणून ते घेऊ नका, असे आवाहन जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांनी केले आहे. ते म्हणाले, रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. अपघाताच्यावेळी बोगस हेल्मेटचे कवच आणि आतील खिळेच धोकादायक ठरतात. अनेक प्रकरणात हेल्मेटचे खिळे डोक्यात शिरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच बनावट हेल्मेटपासून दूर रहायला हवे.बोगस हेल्मेटवर कारवाईची मोहीम‘रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये विना हेल्मेट असलेल्या चालकांची संख्या मोठी आहे. यात आता बोगस हेल्मेटमुळे गंभीर जखमी होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे. निकृष्ट दर्जाचा हेल्मेटचा वाढता वापर पाहता लवकरच यावर कारवाई मोहीम हाती घेण्यात येईल.-विक्रम साळी, पोलीस उपायुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघातmotercycleमोटारसायकल