शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

कोराडी महोत्सवादरम्यान ‘हेलिकॉप्टर शो’

By admin | Updated: September 2, 2016 02:51 IST

यंदाच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नवरात्रोत्सवादरम्यान कोराडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरात पोहोचणार कोराडीतील नवरात्रोत्सव : पालकमंत्र्यांनी घेतला सुविधांचा आढावानागपूर : यंदाच्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी नवरात्रोत्सवादरम्यान कोराडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १० आॅक्टोबर या दरम्यान साजरा होणाऱ्या या महोत्सवाला देशभरात पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. या महोत्सवादरम्यान ‘हेलिकॉप्टर शो’ होणार असून पाण्यावरील विमानाचेदेखील सादरीकरण होणार आहे.८ आॅक्टोबर रोजी पहाटे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. कोराडी महोत्सवात मुख्य आकर्षण ‘हेलिकॉप्टर शो’ आणि पाण्यावरील विमान (सी प्लेन) राहील. या दोन्हीची जबाबदारी माजी आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर टाकण्यात आली. ‘हेलिकॉप्टर शो’ व ‘सी प्लेन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यासंबंधात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी एकूण तयारी व सुविधांचा आढावा घेतला दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. पीयूष कुमार हे या महोत्सवासाठी कार्यक्रमांचे नियोजन करीत आहेत. संपूर्ण देशभरातील मोठ्या कलाकारांची हजेरी या महोत्सवाला राहणार आहे. देशभर हा उत्सव पोहोचावा असे नियोजन करण्यात येणार आहे. गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम, मोठे कार्यक्रम, देवीचा गोंधळ, देशाच्या संस्कृतीची जनजागृती करणाऱ्या कार्यक्रमांचा यात समावेश राहणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात ही आढावा बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, कोराडीच्या सरपंच अर्चना मैंद, महादुला नगर पंचायत अध्यक्ष सीमा जयस्वाल, जि.प. सीईओ कादंबरी बलकवडे, माजी आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी, संस्थानचे सर्व विश्वस्त व पदाधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.मंदिरकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पथदिवेमहानिर्मितीला कोराडी, खापरखेडा व मंदिराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महादुला पंपहाऊस, महादुला ते सुरादेवी, महादुला ते मंदिर, मागील बाजूचे कंपाऊंड या रस्त्यांवर एलईडी लाईट लावण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायतने घनकचरा व्यवस्थापनाची व्यवस्था करावी. भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे म्हणून पाच अल्ट्रा फिल्टर वॉटर प्लान्ट एक हजार लिटरवाले लावावे. ग्रामपंचायतने प्रसाधन व्यवस्थेचा आराखडा तयार करून मंजूर करवून घ्यावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या आहेत.