शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मासिक पाळीनंतर खुंटते उंची : केवळ दोन इंच वाढते उंची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 18:57 IST

पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची खुंटते. जास्तीत जास्त उंचीमध्ये केवळ दोन इंचाची वाढ होते, अशी माहिती प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांनी दिली.

ठळक मुद्देबालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांची माहिती५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ची सुरुवात

आॅनलाईन लोकमतनागपूर : पूर्वी मुलींमध्ये मासिक पाळी येण्याचे वय हे साधारण १५ वर्षे होते, परंतु अलीकडे साडेअकरा वर्षातच मुलींना पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात हे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे, मुलींमध्ये मासिक पाळीला सुरुवात झाल्यानंतर उंची खुंटते. जास्तीत जास्त उंचीमध्ये केवळ दोन इंचाची वाढ होते, अशी माहिती प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. हरी मंगतानी यांनी दिली.बालरोग अकादमीच्यावतीने गुरुवारपासून रेशीमबाग परिसरात ५५वी भारतीय बालरोग परिषद ‘पेडीकॉन-२०१८’ची सुरुवात झाली. या परिषदेत डॉ. मंगतानी सहभागी झाले असून ते पत्रकारांशी बोलत होते.डॉ. मंगतानी म्हणाले, आपल्याकडे मुला-मुलींच्या उंचीकडे विशेष लक्ष दिले जात नाही. मुलांची वाढ नैसर्गिक होते, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, जेव्हा मुलाची उंची वाढत नाही तेव्हाच आई-वडील डॉक्टरांकडे जातात. यातही उंची जास्त असेल तर डॉक्टरांकडे जात नाही. परंतु या दोन्ही स्थितीत लवकरात लवकर घेतलेला डॉक्टरांचा सल्ला फायद्याचा ठरतो. यावर उपचार आहेत.शंभरात तीन मुलांमध्ये उंचीची समस्याडॉ. मंगतानी म्हणाले, लहान मुलांमध्ये कमी उंचीचे प्रमाण १०० मध्ये ३ असे आहे तर जास्त उंचीचे प्रमाण १०० मध्ये २ ते ५ असे आहे. मुला-मुलींमध्ये उंची वाढत नसेल किंवा अति उंच होत चालला असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. थायरॉईड, ग्रोथ हार्माेनची कुठली समस्या आहे याचे निदान करून त्यावर उपचार केला जाऊ शकतो.दोन-तीन वर्षे एकाच मापाचे शर्ट होत असेल तर धोकाडॉ. मंगतानी म्हणाले, जर दोन ते तीन वर्षे मुलाला एकाच मापाचे शर्ट होत असेल, शूजच्या आकार वाढलेला नसेल, तर मुलामध्ये काहीतरी समस्या आहे हे पालकांनी ओळखायला हवे. यावर डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.अतिलवकर वयात आल्यास उंचीवर परिणाममुलींमध्ये ११ ते १३ वर्षांमध्ये मासिक पाळी येण्याचे प्रमाण वाढले आहे तर मुलांमध्ये कमी वयातच चेहऱ्यावर केस वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. अति लवकर वयात येण्याच्या या समस्येमुळे उंचीवर परिणाम होतो. उंची खुंटते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात ही समस्या मोठी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार हा आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर