शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था : दोन हजार पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:56 IST

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देहैदोस घालणाऱ्यांवरही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांसह दोन हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी बुधवारी शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.काश्मीर येथील कलम ३७० हटविल्यानंतर दहशतवादी संघटनेतर्फे देशातील प्रमुख शहरांमध्ये घातपात घडविण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुप्तचर संस्थांनी पोलीस आणि सेनेला सतर्क केले आहे. देशातील सर्व प्रमुख शहरे आणि विमानतळांना ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. नागपूर शहराचे महत्त्व अलीकडे प्रचंड वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीसही सतर्क झाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या समारंभासह शहरातील सर्व गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसाना तैनात करण्यात आले आहे. बाजारांमधील निगराणी वाढवण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण इमारतींवरही पोलीस पथक तैनात करण्यात आले आहेत. संदिग्ध हालचालींवर नजर ठेवण्यासाठी साध्या वेशातही पोलीस तैनात राहतील. बंदोबस्तात तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना बारीक नजर ठेवण्याचे निर्देश बजावण्यात आले आहेत.स्वातंत्र्यदिनाच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व प्रमुख चौकांमध्ये पोलीस तैनात राहतील. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. कुठलीही संशयास्पद हालचाल किंवा संदिग्ध वस्तू आढळून आल्यास पोलिसांना सूचित करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी नागरिकांना केले आहे.स्कूल बस-व्हॅन सुरू ठेवास्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्कूल बस व व्हॅन सुरू ठेवाव्या असे आवाहन वाहतूक विभागाने स्कूल संचालकांना केले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध शाळांमध्ये ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्कूल व्हॅन किंवा बस बंद राहिल्यास पालकांना त्रास सहन करावा लागू शकतो. तेव्हा पालकांना होणारा त्रास लक्षात घेता वाहन चालक-मालकांनी त्यांना सहकार्य करीत स्वातंत्र्यदिन साजरा करावा.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनPoliceपोलिस