लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुसळधार पावसामुळे मुंबईहून नागपुरात सकाळी येणाऱ्या तीन विमानांना विलंब झाला. तर एअर इंडियाचे सकाळी ७.२० वाजता नागपुरात येणारे एआय ६२६ मुंंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गो एअरचे विमान तब्बल चार तास उशिरा नागपुरात पोहोचले. देशाच्या अन्य भागातून नागपुरात येणारी एकूण सहा विमाने दुपारी १.३० पर्यंत उशिरा पोहोचली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
नागपूर धावपट्टीचे लाईट शॉटसर्किटने बंद : दुबई-मुंबई विमान नागपुरात उतरले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे लाईट शॉर्ट सर्किटमुळे चार तास बंद असल्यामुळे नागपुरात येणारी काही विमाने हैदराबादला वळविण्यात आली. मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाची एक धावपट्टी दुपारी २ पर्यंत बंद करण्यात आल्यामुळे मुंबईची काही विमाने नागपुरात वळविण्यात आली. चार विमाने रद्द करण्यात आली आणि काही विलंबाने नागपुरात पोहोचली. कतार एअरवेजचे क्यूआर-५९० दोहा-नाागपूर विमान हैदराबादला वळविण्यात आले. यामुळे क्यूआर ५९१ नागपूर-दोहा विमान (मंगळवारी सकाळी ३.४० वाजता) रद्द करण्यात आले. मुंबईत मुसळधार पावसामुळे ६ई ०६२ दुबई-मुंबई विमान नागपुरात वळविण्यात आले. नागपुरशी सबंधित पाच उड्डाने रद्द करण्यात आली तर एकूण सहा विमाने वळवून नागपुरात उतरविण्यात आली. नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवरील लाईट पहाटे ४ वाजता सुरळीत करण्यात आले, पण त्यापूर्वीच धावपट्टीवर अंधार असल्यामुळे इतरत्र वळविण्यात आली.