शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

नागपुरात होळी-धुळवडीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 00:09 IST

रंगाचा, उल्हासाचा उत्सव होळी आणि धुळवड शांततेत साजरा करा. त्याचा आनंद घ्या. कुणावर रंग लावण्यासाठी जबरदस्ती करू नका किंवा डीजे वाजवून धांगडधिंगा करू नका, अन्यथा तुम्हाला होळी-धुलिवंदन पोलीस ठाण्यात करावे लागेल, असा खणखणीत इशारा पोलिसांनी दिला आहे. होळी व धुलिवंदनाचा सण नागरिकांना शांततेत साजरा करता यावा यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताची योजना आखली आहे.

ठळक मुद्देहोळी-धुळवडीचा आनंद घ्या : डीजे वाजविल्यास थेट कोठडीत जाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंगाचा, उल्हासाचा उत्सव होळी आणि धुळवड शांततेत साजरा करा. त्याचा आनंद घ्या. कुणावर रंग लावण्यासाठी जबरदस्ती करू नका किंवा डीजे वाजवून धांगडधिंगा करू नका, अन्यथा तुम्हाला होळी-धुलिवंदन पोलीस ठाण्यात करावे लागेल, असा खणखणीत इशारा पोलिसांनी दिला आहे. होळी व धुलिवंदनाचा सण नागरिकांना शांततेत साजरा करता यावा यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्ताची योजना आखली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता प्रत्येक मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी मोहीम राबविणार आहे. शाळकरी मुलामुलींचे वसतिगृह, महिलांच्या वसतिगृहाजवळ फिक्स पॉईंट लावण्यात आले आहेत. या परिसरात पोलीस सलग गस्त करणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणारे, दारूच्या नशेत वाहन चालविणारे, बेदरकारपणे वाहनचालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. डीजे वाजविण्यास परवानगी नाही. त्यामुळे कुणी डीजे वाजविताना दिसल्यास थेट गुन्हा दाखल करून डीजे सेट जप्त केला जाणार आहे. दारूच्या नशेत निष्काळजीपणे वाहन चालवून स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करू नका, असे भावनिक आवाहन आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे.तिसरा डोळा ठेवणार लक्षशहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तसेच सीओसीच्या माध्यमातून शहरातील वातावरणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. हातभट्टी तसेच अवैध दारू विक्री करणारे, शस्त्रे बाळगणारे आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार तपासण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत. शहर पोलीस नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर आहे. मात्र, नागरिकांनीही सणोत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी केले आहे.अडीच हजार पोलीस तैनातहोळीच्या बंदोबस्तामध्ये ५ पोलीस उपायुक्त, १० सहायक आयुक्त, ४० पोलीस निरीक्षक, २०८ सहायक निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक तसेच १ ८४३ पुरुष आणि १९० महिला पोलीस होळी-धुळवडीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहे. मदतीला राज्य राखीव पोलीस दलाची १ कंपनी, २ प्लाटून आणि १०० होमगार्ड राहणार आहेत. याव्यतिरिक्त क्यूआरटी, आरसीपी, विशेष शाखा आणि तसेच गुन्हे शाखेचा ताफाही सक्रिय राहणार आहे.

 

टॅग्स :HoliहोळीPoliceपोलिस