शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांना भावपूर्ण निरोप; 'तुम्ही परत या' ची एकमुखी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:57 IST

महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या, फुलांचा वर्षाव करणाऱ्या व घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या नागपूरकरांना हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महानगरपालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या, फुलांचा वर्षाव करणाऱ्या व घोषणांचा पाऊस पाडणाऱ्या नागपूरकरांना हात जोडून नमस्कार केला व त्यांचा निरोप घेतला.शुक्रवारची सकाळ तपस्या या आयुक्त निवासासमोर वेगळीच उजाडली होती. काहीशी खिन्न तर बरीचशी आक्रमक..नागपुरातील सामान्यजनांच्या पसंतीस खरे उतरलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे मुंबईस रवाना होणार होते.. त्याकरिता त्यांना निरोप द्यायला गुरुवारपासूनच त्यांच्या द्वारी रीघ लागलेली होती.. कुणी पुष्पगुच्छ आणत होते.. कुणी त्यांचे रेखाचित्र काढून आणत होते.. तर कुणी त्यांना राखी बांधत होते.. तर कुणी काही भेटवस्तूही आणताना दिसत होते..जो तो आपापल्या परीने आपल्या भावना व्यक्त करीत होते..शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच मुंढे यांच्या निवासस्थानासमोर गर्दी जमू लागली होती. पाहता पाहता ती वाढू लागली. तुकाराम मुंढे परत या अशा घोषणा हवेत निनादू लागल्या.. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही हजर झाले होते. पोलीस बंदोबस्तही तगडा होता.शेवटी साडेदहाच्या सुमारास तुकाराम मुंढे बाहेर आले.. उपस्थित नागरिकांना त्यांनी अभिवादन केले व ते गाडीत बसले.. त्यांच्या गाडीवर फुलांचा, घोषणांचा, गुलालाचा वर्षाव करण्यात आला. उपस्थित पोलिसांनी त्यांना अभिवादन केले... त्याचा स्वीकार त्यांनी केला.. आणि ते विमानतळाकडे रवाना झाले.. नागपुरात याआधी कोणत्याही आयुक्तांना अशा प्रकारने नागपूरकरांचे प्रेम मिळाले नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

तुकाराम मुंढे यांचा निरोपाचे शब्द...

तुम्ही मला इतकं प्रेम दिलंत, निरोप देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात.. मी सगळ््यांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही माझ्या मनात कायम रहाल. नागपूरकरांचे प्रेम अविस्मरणीय आहे. मी माझे काम करीत राहीनच. माझ्याकडून जेवढं करता आलं तेवढं १०० टक्के काम मी केलं आहे. हे शहर तुमचं आहे.. त्याला चांगलं बनवण्यात तुमचा वाटा मोलाचा आहे. शहरातील समस्या ओळखा व त्यावर काम करा. संघटित रहा.. जयहिंद..

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे