शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हृदय मुंबईत, फुप्फुस पुण्यात, अन्...; परभणीतील तरुणाचे अवयवदान; ५ रुग्णांना जीवनदान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:07 IST

दीपक शनिवारी शेतातून चालत असताना, अचानक तोल जाऊन पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : परभणीतील एका युवकाच्या अवयवदानाने पाच जणांना नवे आयुष्य मिळाले. विशेष म्हणजे, या युवकाचे हृदय चार्टर विमानाने मुंबईत, फुफ्फुस पुण्यात, तर यकृत ४५० किलोमीटरचे ग्रीन कॉरिडॉर करून नागपुरात आणले. छत्रपती संभाजीनगर येथील दोन रुग्णांना मूत्रपिंड दान करण्यात आले.  दीपक विलासराव दराडे (वय २५, रा. जिंतूर, जि. परभणी) असे अवयवदात्याचे नाव आहे. दीपक शनिवारी शेतातून चालत असताना, अचानक तोल जाऊन पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.  

परभणीतील तरुणाचे अवयवदान; ५ रुग्णांना जीवनदान 

मेंदूत अंतर्गत रक्तस्राव झाला आणि कोमामध्ये गेला. त्याला उपचारासाठी परभणीच्या देवगिरी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासून मेंदू मृत झाल्याचे निदान केले. सोबतच नातेवाइकांना अवयवदानासाठी समुपदेशन केले.वडील विलास दराडे, आई कुसुम दराडे, भाऊ राजू आणि माधव यांनी त्या दु:खातही अवयवदानाला संमती दिली. देवगिरी हॉस्पिटल प्रशासनाने पुढील प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर ‘झेडटीसीसी’ने नियमानुसार, हृदय मुंबईतील ५३ वर्षीय महिला रुग्णाला, फुफ्फुस पुण्याच्या ५० वर्षीय महिलेला, यकृत नागपूरमधील ६३ वर्षीय रुग्णाला, तर दोन मूत्रपिंडांपैकी एक छत्रपती संभाजीनगर येथील ५२ वर्षीय रुग्णाला, दुसरे छत्रपती संभाजीनगर येथीलच ३५ वर्षीय रुग्णाला दान दिले. 

परभणी ते नागपूर दरम्यान ४५० किमीचे ग्रीन कॉरिडॉरपरभणी ते नागपूर ग्रीन कॉरिडॉर करून रुग्णवाहिकेतून यकृत पाच तासांत नागपुरात पोहोचले. तब्बल ४५० किलोमीटर अंतराचे पहिल्यांदा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले.नागपूर येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना यांनी यकृत प्रत्यारोपण केले. यापूर्वी, २०२३ मध्ये एम्स रायपूरमधून यकृत नागपुरात आणले होते. त्यानंतर आता परभणीतून यकृत आणले गेले.    

टॅग्स :Organ donationअवयव दान