शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

‘हार्ट फेल्युअर’च्या २५ टक्के रुग्णांमध्ये हृदयाचे कार्य पुन्हा सुरळीत करता येते

By सुमेध वाघमार | Updated: June 28, 2025 19:46 IST

डॉ. जे.सी. मोहन : ‘ईको’ नागपूर परिषदेत हृदयरोग तज्ज्ञ आले एकत्र

नागपूर : ‘हार्ट फेल्युअर’ ही एक अशी स्थिती आहे जिथे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात किंवा कडक होतात, ज्यामुळे हृदय प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. ही एक गंभीर स्थिती असलीतरी यावर नवी औषधे इतकी प्रभावी ठरत आहेत की जवळपास २५ टक्के रुग्णांमध्ये पुन्हा हृदयाचे कार्य सुरळीत करता येते. याशिवाय ५० टक्के रुग्णांवर आता प्रभावी नियंत्रण ठेवता येते, अशी माहिती सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जे. सी. मोहन यांनी दिली.   

‘इको नागपूर परिषद-२०२५’मध्ये ते मुख्य वक्ता म्हणून सहभागी झाले असताना ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मोहन म्हणाले, ‘हार्ट फेल्युअर’ आणि ‘हार्ट अटॅक’ यात मोठा फरक आहे. हार्ट अटॅकमध्ये अचानक रक्तपुरवठा थांबतो, तर ‘हार्ट फेल्युअर’मुळे रक्त पंप करण्याचे क्षमता कमी होत जाते. शरीराच्या अवयवांना पुरेसा आॅक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. भारतातील जवळपास एक कोटी प्रौढ व्यक्तींना ‘हार्ट फेल्युअर’चा त्रास आहे.

‘हार्ट फेल्युअर’चे परिणाम कॅन्सरपेक्षाही वाईटदुर्देवाने ‘हार्ट फेल्युअर’ या आजाराचा परिणाम अनेकदा काही कॅन्सरपेक्षाही वाईट असतो. कारण हा आजार ओळखला जात नाही, कमी गांभीर्याने घेतला जातो आणि वेळेवर उपचार होत नाहीत. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºयांना ह्या आजाराचा धोका अधिक आहे, असेही डॉ. मोहन यांनी स्पष्ट केले. 

नव्या औषधांमुळे आयुष्य वाढवता येते‘हार्ट फेल्युअर’ असलेल्या रुग्णांचे आयुष्य नव्या औषधांमुळे जवळपास सहा ते आठ वर्षांनी वाढवता येते. यासाठी लवकर निदान, योग्य औषधे आणि उपचार आवश्यक असतो. ईको, ईसीजी आणि काही रक्ततपासण्यांमधून या आजाराचे निदान केले जाते.

भारतीयांना कोलेस्टेरॉलची अधिक काळजी घ्यावीया परिषदेत लिपिड असोसिएशन आॅफ इंडियाचे माजी अध्यक्ष, डॉ. विनोद विजन यांनीही महत्त्वाचे निरीक्षण मांडले. भारतीयांची शरीररचना आणि आनुवंशिकता लक्षात घेता, भारतीयांनी जागतिक प्रमाणापेक्षा किमान १० पॉईंट्सने कमी कोलेस्टेरॉल टार्गेट ठेवायला हवे. 

‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र‘ईको परिषदे’चे कार्यक्रम संचालक डॉ. शंतनू सेनगुप्ता म्हणाले, हे ‘ईको’चे २१ वे वर्ष असून, आज सर्वसामान्य लोकही ‘इकोकार्डियोग्राफी’बद्दल जागरूक झाले आहेत. ‘ईको’ आता सर्वसामान्य तपासणीतले महत्त्वाचे शस्त्र झाले आहे. या तंत्रज्ञानामळे हृदयातील त्रास लवकर ओळखता येतो. ४० वर्षांनंतर दरवर्षी ईको तपासणी करणे आवश्यक आहे. दोन दिवसांच्या या परिषदेत देशभरातील हृदयरोग तज्ज्ञ एकत्र आले आहेत. परिषदेतील विविध व्याख्यानांतून हृदयाच्या आजारांचे लवकर निदान, अचूक उपचार व बहुविशेषज्ञांचे सहकार्य यांचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.

टॅग्स :Heart Diseaseहृदयरोगnagpurनागपूर