शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या पडलेल्या दाेन दिवसांच्या बाळाचा वाचवला जीव, हृदयाची रक्तवाहिनी फुप्फुसाला जोडण्याची शस्त्रक्रिया यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 06:10 IST

सुमेध वाघमारे नागपूर : हृदयाकडे येणारे रक्त शुद्धीकरणासाठी फुप्फुसाकडे पाठविण्याऐवजी प्रणालीगत रक्ताभिसरणात विचलित व्हायचे. यामुळे अवघ्या दोन दिवसाच्या नवजात ...

सुमेध वाघमारेनागपूर :

हृदयाकडे येणारे रक्त शुद्धीकरणासाठी फुप्फुसाकडे पाठविण्याऐवजी प्रणालीगत रक्ताभिसरणात विचलित व्हायचे. यामुळे अवघ्या दोन दिवसाच्या नवजात शिशूला श्वास घेणे कठीण झाले होते. त्याचे संपूर्ण शरीर निळसर पडले होते. बाळाची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. हृदयाची रक्तवाहिनी फुप्फुसाला जोडण्याची शस्त्रक्रिया केली. १७ दिवस बाळावर विशेष उपचार करत बाळाचे प्राण वाचविले.

नागपुरातील एका महिलेने २३ मार्च रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन सव्वादोन किलो होते. परंतु, बाळाला जन्मत: हृदयविकार होता. २४ मार्च रोजी नातेवाईक बाळाला घेऊन ‘कार्डियन’ रुग्णालयात आले. हृदयरोग शल्य चिकित्सक डॉ. निकुंज पवार यांनी तपासून ‘कन्जनायटल सायनोटिक हार्ट डिसिज’चे निदान केले. 

दीड-दोन वर्षांनंतर पुन्हा शस्त्रक्रियादीड-दोन वर्षानंतर या बाळावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल. यात हृदयात असलेले छिद्र बंद केले जाईल. शिवाय, हृदयातून फुप्फुसाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीचा आकार मोठा केला जाईल.     - डॉ. निकुंज पवार, हृदय शल्य चिकित्सकफुप्फुसे बंद पडण्याचा धोका होताबाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी पुढील काही दिवस महत्त्वाचे होते. यात त्याच्या ‘न्युट्रिशियन्स’ची समस्या होती. बाळ थंड पडण्याची भीती होती व फुप्फुस बंद पडण्याचा धोका होता. परंतु, सलग १७ दिवसांच्या उपचारानंतर बाळ धोक्याबाहेर आले. 

डॉ. पवार यांनी ‘सांगितले की, हृदय रक्त फुप्फुसांपर्यंत पोहोचवते. हृदय, फुप्फुस किंवा रक्तामध्ये काहीही समस्या निर्माण झाल्यास रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, यामुळे त्वचेचा रंग निळा पडू लागतो.