शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

बांगलादेश एअरलाईन्सच्या मुख्य वैमानिकाला हृदयविकाराचा झटका; नागपुरात आकस्मिक लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 19:16 IST

Nagpur News मस्कत येथून ढाकाकडे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्स विमानाच्या मुख्य वैमानिकाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.

ठळक मुद्देवैमानिकावर उपचार सुरूसहवैमानिकाने केले यशस्वी लॅण्डिंग

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मस्कत येथून ढाकाकडे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्स विमानाच्या मुख्य वैमानिकाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. 

(Heart attack on Bangladesh Airlines chief pilot; Accidental landing at Nagpur)

नागपूरवरून जाणाऱ्या बांगलादेश एअरलाईन्सचे विमान बीजी-२२ चे मुख्य वैमानिक नौशाद अताउल कयूम यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सहवैमानिकाने विमानाचे नियंत्रण ताब्यात घेऊन नागपूर एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत (एटीसी) संपर्क साधला आणि नागपूर विमानतळावर विमान तातडीने उतरविण्याची परवानगी मागितली. नागपूर एटीसीने वेळेचे महत्त्व समजून तात्काळ आकस्मिक लॅण्डिंगची परवानगी दिली आणि सकाळी ११.२३ वाजता विमानाचे यशस्वीरीत्या लॅण्डिंग करण्यात आले.

यादरम्यान पूर्वीपासून धावपट्टीवर उपस्थित असलेले किंग्सवे हॉस्पिटल्सचे डॉ. मोहम्मद एहतेशामुद्दीन यांनी तातडीने ढाका (बांगलादेश) निवासी ४३ वर्षीय कॅप्टन नौशाद अताउल कयूम यांना बेशुद्ध अवस्थेत विमानातून बाहेर काढले आणि प्राथमिक तपासणीसाठी ॲम्ब्युलन्सने किंग्सवे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. किंग्सवे हॉस्पिटलचे कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र गंजेवार म्हणाले, नौशाद अताउल कयूम यांच्यावर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. सध्या ते कोमात आहेत.

विमानात १२६ प्रवासी

बांगलादेश एअरलाईन्सचे १६० सीटांचे विमान बोईंग-७३८ असून, त्यामध्ये १२६ प्रवासी होते. सहवैमानिकाने विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरविले. विमानातील सर्व प्रवाशांना उतरवून टर्मिनलमध्ये आणण्यात आले. त्यांना नाश्ता आणि खाद्यपदार्थ देण्यात आले. प्रवाशांची देखरेख एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडने केली. प्रवाशांना रात्रीपर्यंत ढाका येथे नेण्यासाठी वैकल्पिक व्यवस्था करण्यात येत होती.

टॅग्स :Airportविमानतळairplaneविमान