शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

हेल्थ लायब्ररी : ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनिया : अतिशय चिंताजनक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

- झोपेत श्वासोच्छवासाच्या अडथळ्याचे मुख्य प्रकार कोणते? सर्वात सौम्य प्रकार म्हणजे रात्रीच्या वेळी घोरणे. सर्वात गंभीर म्हणजे ‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप ...

- झोपेत श्वासोच्छवासाच्या अडथळ्याचे मुख्य प्रकार कोणते?

सर्वात सौम्य प्रकार म्हणजे रात्रीच्या वेळी घोरणे. सर्वात गंभीर म्हणजे ‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनिया’. यात फुफ्फुसाला श्वास घेताना आणि बाहेर सोडताना अडथळा येतो. जेव्हा ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते किंवा कार्बनडाय ऑक्साईड पातळी खूप जास्त वाढते, तेव्हा मेंदू प्रतिसाद देणे थांबवते. याला ‘सेंट्रल स्लीप अ‍ॅपनिया’ म्हणतात. हा सुद्धा एक गंभीर आजार आहे. याशिवाय ‘कॉम्प्लेक्स स्लीप अ‍ॅपनिया’ हे या दोन आजाराचे मिश्रण आहे.

-‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनिया’चा धोका कुणाला?

ज्या लोकांचे वजन खूप जास्त आहे. पोट, गळ्याभोवती चरबी आहे, उंची कमी असूनदेखील ही समस्या आहे त्यांना ‘ऑब्स्ट्रॅक्टिव्ह स्लीप अ‍ॅपनिया’चा धोका होऊ शकतो. यात वयदेखील एक महत्त्वाचा घटक आहे. हा आजार सामान्यत: ६० ते ८० वर्षे वयोगटातील लोकांना दिसतो. रजोनिवृत्तीनंतर लठ्ठपणा असलेल्या स्त्रियांमध्येदेखील हा आजार दिसून येतो.

- या आजाराशी संबंधित इतर वैद्यकीय समस्या?

मधुमेह, उच्च रक्तदाब, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, कोरोना आर्टरी डिसिज, सीओपीडी, आर्ट्रियल फायब्रिलेशन, गॅस्ट्रो-ओएसोफेगल रिफ्लक्स, हायपोथायरॉईडीज्मदेखील झोपेच्या विकारांशी संबंधित आहेत. केवळ झोपेचे विकारच याला जबाबदार नाहीत.

- ओएसएची मुख्य लक्षणे?

- अशा लोकांसोबत झोपणाऱ्या लोकांच्या मते,‘ओएसए’ग्रस्त रुग्ण रात्री झोपेमध्ये घोरतात. याव्यतिरिक्त अचानक श्वास थांबणे, गुदमरणे आदी लक्षणे दिसून येतात. इतर लक्षणामध्ये सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होतो. रात्री वारंवार लघवी होणे हे देखील एक लक्षण आहे. रात्री झोप न येणे व दिवसा झोपेची भावना निर्माण होणे, कामाची आवड कमी होणे, दिवसा थकवा येणे, ही सामान्य लक्षणे आहेत. एकाग्रतेचा अभाव आणि झोप येणे हे सुद्धा लक्षण आहे.

- निदान कसे केले जाते?

‘अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन’च्या नुसार, काही प्रकरणांमध्ये ‘डायग्नोस्टिक टेस्टिंग’ची गरज पडते. यामध्ये जे लोक दिवसा जास्त झोपतात, रात्री झोपताना घोरतात आणि ज्या लोकांना अचानक दम लागतो, अशा लोकांचा यात समावेश आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना पुढील तपासणीचीदेखील गरज पडते. ‘होम स्लीप अ‍ॅपनिया’ची चाचणी किंवा ‘पॉलिस्मोनोग्राफी’ची शिफारस केली जाते.

-‘ओएसए’पासून संभाव्य त्रास?

‘ओएसए’ असलेल्यांमध्ये वाहन अपघात, कामावर अपघात, उच्च रक्तदाब, कोरोनरी हार्ट डिसिज, झोपेत अचानक मृत्यू, अनियमित हृदयाचा ठोका, स्ट्रोक, मधुमेह, मेटाबोलिक सिंड्रोम, सेक्सुअल डिसफंक्शन, दमा आणि सीओपीडीत वाढ, फॅटी लिव्हर यासारख्या समस्या संभवतात.

-‘ओएसए’ आणि उच्च रक्तदाबाचा संबंध

सामान्य लोकांमध्ये झोपेच्यादरम्यान रक्तदाब १० टक्क्यापर्यंत खाली येतो. हे ओएसए असलेल्या लोकांमध्ये होत नाही. यामुळे नंतर उच्च रक्तदाबाचे हे कारण ठरते.

- त्रस्त लोकांना मदत कशी करावी?

रुग्णांचे वर्तन सुधारण्याची गरज आहे. लठ्ठपणा असलेल्या लोकांना आहार, वजनावर नियंत्रण ठेवायला हवे. ‘बॅरियाट्रिक’ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. मद्यपान आणि झोपेच्या गोळ्या टाळायला हव्यात. मुख्य थेरपी म्हणजे,‘पॉझिटिव्ह प्रेशर एअरवे थेरपी’. ही ‘सीपीएपी’, बाय-लेव्हल (बायपेप) किंवा ऑटो टीट्रेटिंग मोड्समध्ये असू शकते. ‘सीपीएपी’मध्ये, श्वसन प्रणालीचा वरचा भाग सुधारला जातो. ‘सीपीएपी’मुळे घोरणे, दिवसा झोप, उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते.

-सर्जिकली करेक्टेबल आॅब्सट्रक्टिव्ह लेसन्स?

गळा, चेहरा, वाढलले ‘अ‍ॅडेनॉयड्स’ आणि ‘टॉन्सिल्स’मधील दोष दूर करण्यासाठी सामान्य शस्त्रक्रिया केली जाते. आॅब्सट्रक्टिव्ह लेसन्सला शस्त्रक्रियेद्वारे दुरुस्त केले जाऊ शकते. ‘पॉजिटिव एअरवे प्रेशर थेरपी’ प्रभावी नसेल तर शस्त्रक्रियेच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो.