शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

"दहा वर्षांत आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या"; ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’चे थाटात वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 10:19 IST

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मांडला आरोग्याच्या प्रगतीचा आलेख...

नागपूर : गेल्या दहा वर्षांत आरोग्यावरील बजेटमध्ये चार ते पाच पटीने वाढ केली असून, त्यात यावर्षी आणखी ७ हजार कोटींची वाढ केली आहे. २०१४ मध्ये २० ते २३ हजार कोटींवर असलेले आरोग्यावरील बजेट गेल्यावर्षी ९० हजार कोटींवर पोहोचले, असे सांगत एकूणच आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. 

लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स’चा दिमाखदार सोहळा बुधवारी हॉटेल सेंटर पॉइंट येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी ज्युरी बोर्डचे अध्यक्ष व ज्येष्ठ न्यूरो फिजिशियन डॉ. चंद्रशेखर मेश्राम होते. 

प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रसिद्ध नेत्रचिकित्सक व माजी खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, तर सन्माननीय अतिथी म्हणून ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, ज्युरी बोर्डचे सचिव ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल, ‘लोकमत टाइम्स’चे संपादक एन. के. नायक, ‘लोकमत समाचार’चे ज्येष्ठ संपादक विकास मिश्र, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने उपस्थित होते.

या सरकारच्या काळात जनऔषधी योजनेमुळे स्वस्तात औषध उपलब्ध झाले. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांचा विमा सामान्य नागरिकांना मिळणार आहे. एमबीबीएसला २०१४च्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. मेडिकल कॉलेजही दुपटीने वाढले. - डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

आरोग्य सेवा परवडणारी व्हावी -देशातील आरोग्य क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्य सेवा ही परवडणारी असावी, अन्यथा लोकांचा विश्वास उडेल. मेडिकल शिक्षण महाग होत आहे. मेडिकलच्या जागा वाढविण्याची आवश्यकता आहे. खासगी दवाखान्यांमध्ये लागणारी उपकरणे महाग झाली आहेत. परिणामी रुग्णाला स्वस्त आरोग्य सेवा मिळत नाही.  त्यामुळे खासगी हॉस्पिटलला लागणारी जमीन व वैद्यकीय उपकरणे स्वस्तात मिळावी, अशी व्यवस्था सरकारने करायला हवी.- डॉ. विजय दर्डा, लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार 

हॉस्पिटल मॅनेजमेंट स्पेशालिस्ट असावे हॉस्पिटल मॅनेजमेंट हे स्पेशालिस्ट काम आहे. ज्या पद्धतीने हॉटेल मॅनेजमेंटसाठी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचा विचार केला जातो. मग हॉस्पिटल मॅनेजमेंटसाठी त्या क्षेत्रातील स्पेशालिस्ट व्यक्ती का नको? ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. या कामासाठी तज्ज्ञ व्यक्तीचीच निवड केली जावी.-पद्मश्री डॉ. विकास महात्मे, माजी खासदार 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतVijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमत