शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

आरोग्य विभागाची ‘१०८’ खासगी इस्पितळांच्या दिमतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 2:15 PM

आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली. रस्त्यावरील अपघातांसह ग्रामीण भागात आरोग्यविषयक सेवा सुविधा जलदगतीने पोहोचाव्यात, हा यामागचा उद्देश होता. याचा फायदाही रुग्णांना होत आहे. मात्र काही डॉक्टर व चालक कमिशनच्या हव्यासापोटी खासगी हॉस्पिटलच्या दिमतीला बांधले गेल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत असल्याचे चित्र आहे. रुग्णांची दिशाभूल करून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचविले जात आहे. रविवारी असेच एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली.

ठळक मुद्देगरीब रुग्णांची दिशाभूल : कमिशनच्या मोहात अडकत आहे रुग्णवाहिका

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा जलद मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने ‘१०८’ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरू केली. रस्त्यावरील अपघातांसह ग्रामीण भागात आरोग्यविषयक सेवा सुविधा जलदगतीने पोहोचाव्यात, हा यामागचा उद्देश होता. याचा फायदाही रुग्णांना होत आहे. मात्र काही डॉक्टर व चालक कमिशनच्या हव्यासापोटी खासगी हॉस्पिटलच्या दिमतीला बांधले गेल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत असल्याचे चित्र आहे. रुग्णांची दिशाभूल करून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये पोहोचविले जात आहे. रविवारी असेच एक प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली.अपघातातील जखमी, हृदयविकाराच्या झटका आलेल्या किंवा गंभीर रुग्णांना जागेवरच प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत शासकीय रुग्णालयात पोहोचविण्यासाठी शहरात १०८ क्रमांकाच्या २२ रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते. नागपूर जिल्ह्यात साधारण एवढ्याच संख्येत रुग्णवाहिका आहेत. भारत उद्योग समूह (बीव्हीजी) कंपनीकडे या रुग्णवाहिकांची जबाबदारी देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा ३० ते ४० टक्के निधी या रुग्णवाहिकेवर खर्च होत आहे. रुग्णवाहिकेने कमीतकमी वेळात रुग्णाला जवळच्या शासकीय रुग्णलायात दाखल करण्यची अट आहे. परंतु जर रुग्ण जीवन आणि मृत्यूच्या संघर्षात असेल आणि खासगी हॉस्पिटलच्या तुलनेत शासकीय रुग्णालय दूर असेल तर त्या रुग्णाला त्यांच्यानातेवाईकांच्या संमतीने व तसे लेखी लिहून दिल्यावरच खासगी हॉस्पिटलला सोडले जाते. मात्र, अलीकडे १०८ क्रमांकाच्या काही रुग्णवाहिकेतील डॉक्टर व चालक रुग्णांना शासकीय रुग्णालयाविषयी चुकीची माहिती देऊन खासगीमध्ये घेऊन जात असल्याच्या रुग्णांच्याच तक्रारी आहेत.असे घडले प्रकरणरविवार ११ मार्च रोजी दुपारी साधारण ४ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान उमरेड रोडवरील ‘हेटी’ येथे अपघात झाला. यात एक व्यक्ती जखमी झाला. १०८ रुग्णवाहिकेला याची माहिती देण्यात आली. एमएच १४ सीएल ११५५ या क्रमांकाची रुग्णवाहिका जखमीला घेऊन नागपूर मेडिकलसाठी निघाली. मात्र, रुग्णवाहिका मेडिकलमध्ये न येता मेडिकलपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका खासगी रुग्णालयात गेली. तेथे रुग्णाला दाखल केले. एका वरिष्ठ आरोग्य अधिकाºयाकडे याबाबत तक्रार येताच त्यांनी ‘बीव्हीजी’ कंपनीच्या अधिकाºयांना याची माहिती काढण्यास सांगितली. अधिकाºयाने रुग्णवाहिका चालकाला ठिकाण विचारले असता, त्याने सुरुवातीला चुकीची माहिती दिली. कंपनीच्या अधिकाºयाने तपासणी केली असता, रुग्णवाहिका त्या खासगी हॉस्पिटलच्या समोर उभी होती.प्रकरण दडपवण्याचा प्रयत्नया प्रकरणाविषयी तक्रार होताच हे प्रकरण दडपविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सूत्रानुसार, एका व्यक्तीने जखमीला मेडिकलऐवजी खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा आग्रह केल्याचे व तसे लिहून दिले आहे. ही व्यक्ती रुग्णासोबत रुग्णवाहिकेत नव्हती. रुग्णाचा नातेवाईकही नव्हता. अपघात जिथे झाला त्या उमरेड रोडवरील हेटी गावापासून तो रुग्णवाहिकेसोबत स्वत:च्या वाहनाने आल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, ‘हेटी’ गावापासून ते नागपूरच्या मेडिकल चौकदरम्यान अनेक खासगी हॉस्पिटल लागतात. शिवाय, अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावा म्हणून मेडिकलमध्ये ‘ट्रॉमा केअर सेंटर’ असताना ते सोडून नेमक्या ‘त्याच’ खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यामागे कारण काय, हा प्रश्न आहे.तर चौकशी केली जाईलकाही प्रकरणात अपवाद वगळता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने रुग्णाला शासकीय रुग्णालयातच दाखल करण्याचा नियम आहे. परंतु या नियमाचा भंग होत असेल आणि रविवार ११ मार्च रोजी असे प्रकरण घडले असेल तर त्याची चौकशी करून जिल्हाधिकाºयांसमोर हे प्रकरण ठेवले जाईल.-डॉ. हेमंत निंबाळकर,सिव्हिल सर्जन, नागपूर

टॅग्स :Healthआरोग्यCrimeगुन्हा