शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

आरोग्य विभाग : नागपूर  ग्रामीण डॉक्टरांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 18:41 IST

ग्रामीण भागात जे आरोग्य अधिकारी सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य सेवा देत आहेत,तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थांबवून ठेवले आहे. परिणामी, जिल्हा परिषद, नागपूरअंतर्गत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतन नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागरिकांना पुरेशी, गुणात्मक, प्रतिबंधात्मक व रोगनिवारक आरोग्य देखभाल सेवा देण्याची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाची आहे. यासाठी इस्पितळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे ग्रामीण भागात सेवा देण्यास डॉक्टर तयार नसल्याने आजही अनेक जागा रिक्त आहेत. जे आरोग्य अधिकारी सामाजिक बांधिलकी म्हणून आरोग्य सेवा देत आहेत, त्यांच्या घामाचा पैसाही वेळेवर देण्यास प्रशासन तत्परता दाखवीत नाही. उलट तीन महिन्यांपासून त्यांचे वेतन थांबवून ठेवले आहे. परिणामी, जिल्हा परिषद, नागपूरअंतर्गत आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे.एकीकडे कॉर्पाेरेट हॉस्पिटलची संख्या वाढत असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सक्षमपणे चालविणे हे नवीन आव्हान सार्वजनिक आरोग्य विभागासमोर आहे. मात्र, आरोग्य केंद्रांची स्थिती सुधारण्याच्या व रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा गावातच मिळाव्यात, यासाठी कुठल्याही उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. म्हणूनच या रुग्णालयांप्रति रुग्णांचा विश्वास कमी होत चालला आहे. यातच आहे त्या सोयीत रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. मे ते जुलै तब्बल तीन महिन्यांचे त्यांना वेतनच देण्यात आले नाही. यामुळे डॉक्टर अडचणीत आले आहेत. ज्यांनी कर्ज घेतले त्यांचे हप्ते थांबले. त्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. आरोग्य विभाग डॉक्टरांचे वेतन काढण्यास एवढा उशीर लावत असेल तर इस्पितळे कशी चालविले जात असतील, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.सूत्रानुसार, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात ‘अ‍ॅडमिनीस्ट्रेटीव्ह ऑफिसर’चे (एओ) पद रिक्त आहे. यामुळे कार्यरत लिपिकांना जेवढे कळते तेवढेच काम करतात. यातही त्यांच्यावर कामाचा ताण आहे. यामुळे वेळेवर वेतन निघत नाही. यासंदर्भात गुरुवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी वर्ग गट ‘अ’ संघटनेच्यावतीने (मॅग्मो) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांना निवेदन दिले.वेळेवर वेतनाची मागणीगेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य अधिकाऱ्यांचे वेतन मिळाले नाही. यासाठी ‘मॅग्मो’ संघटनेच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी याबाबत सकारात्मक चर्चा केली. लवकरच वेतन उपलब्ध होईल, अशी ग्वाही दिली आहे.डॉ. विद्यानंद गायकवाडअध्यक्ष, मॅग्मो, नागपूर

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर