शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

विदर्भ राज्यासाठी मनोहरांचे कोरे लेटरहेड

By admin | Updated: January 17, 2017 01:47 IST

राज्याचे माजी महाधिवक्ता ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांनी विदर्भवादी नेते राजकुमार तिरपुडे यांना स्वत:चे कोरे लेटरहेड देऊन स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे.

विदर्भाच्या समर्थनार्थ मजकूर लिहिण्याची मुभानागपूर : राज्याचे माजी महाधिवक्ता ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. व्ही. आर. मनोहर यांनी विदर्भवादी नेते राजकुमार तिरपुडे यांना स्वत:चे कोरे लेटरहेड देऊन स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, या लेटरहेडचा स्वतंत्र विदर्भासाठी हवा तसा वापर करण्याची अनुमतीही तिरपुडे यांना अ‍ॅड. मनोहर यांच्याकडून मिळाली आहे. विदर्भ राज्य आंदोलनाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही एक नाविन्यपूर्ण घटना आहे.अ‍ॅड. मनोहर हे देशातील सन्माननीय व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या मताला शासन दरबारी वजन आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे विदर्भ राज्य आंदोलनाला बळ प्राप्त झाले आहे. तिरपुडे इन्स्टिट्यूट आॅफ सोशल अ‍ॅक्शन अ‍ॅन्ड रिसर्चतर्फे सोमवारी माजी उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत अ‍ॅड. मनोहर यांचा सत्कार करण्यात येणार होता. त्यानंतर ‘वेगळ्या विदर्भ राज्याची सक्षमता’ विषयावर त्यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. परंतु, प्रकृती अस्वस्थतेमुळे ते या कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. तत्पूर्वी राजकुमार तिरपुडे अ‍ॅड. मनोहर यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. दरम्यान, अ‍ॅड. मनोहर यांनी स्वतंत्र विदर्भासंदर्भात विचार व्यक्त करून तिरपुडे यांना स्वत:चे कोरे लेटरहेड दिले. स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थ लेटरहेडवर हवा तो मजकूर लिहा व माझी स्वाक्षरी घेऊन जा, असे त्यांनी तिरपुडे यांना सांगितले. त्यावेळी विदर्भ माझा पक्षाचे अध्यक्ष डॉ. गोविंद वर्मा आदी उपस्थित होते. ही माहिती कार्यक्रमात जाहीर करण्यात आली. तसेच, अ‍ॅड. मनोहर यांचे कोरे लेटरहेडही सर्वांना दाखविण्यात आले. अ‍ॅड. मनोहर यांनी विदर्भवादी नेत्यांशी चर्चा करताना विदर्भ सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी विदर्भवादींना लढा सुरू ठेवण्याचे आवाहन करून आंदोलनाला पाठिंबा दिला. आपण स्वतंत्र विदर्भासाठी कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाल्याची माहिती डॉ. वर्मा यांनी कार्यक्रमात दिली. आमदार कपिल पाटील, संस्थेचे सरचिटणीस वामनराव कोंबाडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.(प्रतिनिधी)