\Sनागपूर : महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या उमरेड रोडवरील मुख्यालयात गुरुवारी संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हातमाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कर्मचाऱ्यांनी संविधानाचे वाचन केले. तसेच संविधानातील तत्त्वानुसार काम करण्याचा निर्धार केला. या प्रसंगी हातमाग महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक व्ही.जी. निमजे आणि कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
हातमाग महामंडळाच्या मुख्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST