शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगची अवैध वसुली प्रवाशांसाठी डोकेदुखी

By admin | Updated: May 18, 2017 02:44 IST

नागपूर विमानतळावर पार्किंगसाठी कंत्राटदार अवैध वसुली करीत आहे.

विमानतळावर कंत्राटदाराची मनमानी : शुल्क फलकावर चुकीची माहिती गाड्यांच्या पार्किंगसाठी अवैध वसुली नागपूर विमानतळावर पार्किंगसाठी कंत्राटदार अवैध वसुली करीत आहे. विमानतळावर गेल्या काही दिवसांपूर्वी पार्किंगसंदर्भात नवीन सिस्टिम सुरू झाली आहे. त्यानुसार झोन-१ मध्ये प्रीमियम पिकअप अ‍ॅण्ड ड्रॉप परिसर तयार केला आहे तर झोन-२ ला जनरल पार्किंग परिसर घोषित केला आहे. या दोन्ही ठिकाणी आकारण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पार्किंग शुल्कासंदर्भात प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. प्रीमियम पिकअप अ‍ॅण्ड ड्रॉप परिसरात कारच्या प्रवेशानंतर पहिल्या १५ मिनिटांपर्यंत २०० रुपये शुल्क वसूल करण्यात येत आहे. त्यानंतर प्रत्येक ३० मिनिटाकरिता १०० रुपये वसुलीची एमआयएलने कंत्राटदाराला सवलत करून दिली आहे. पण फलकावर नमूद केल्यानुसार १५ मिनिटानंतर १०० रुपये वसुलीची तरतूद आहे तर जनरल पार्किंग परिसरात पहिल्या पाच मिनिटे नि:शुल्क पार्किंगची सोय आहे. त्यानंतर प्रत्येक ३० मिनिटांसाठी १०० रुपये आकारण्यात येत आहे. पण फलकावर हे शुल्क प्रत्येक १५ मिनिटांसाठी नमूद केले आहे. नवीन नियमानुसार प्रत्येक १५ मिनिटानंतर १०० रुपये आकारण्याची तरतूद होती. पण लोकांनी तक्रार केल्यानंतर त्याचा कालावधी १५ मिनिटांनी वाढवून ३० मिनिटे केला. त्याला १५ ते २० दिवस झाले आहेत, पण फलकावर जुने शुल्क झळकत आहेत. संबंधित कंत्राटदाराने फलक अपडेट केलेले नाही. त्यामुळे बूथसमोरच लोकांचा गार्डसोबत वाद होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणावरून अवैध कमाईवर लक्ष विमानतळ प्रशासनाने सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने प्रीमियम पिकअप अ‍ॅण्ड ड्रॉप परिसर बंद करण्याचा मानस आहे. पण कुणाला नाईलाजाने या परिसरात जाण्याची इच्छा असेल तर त्याला निर्धारित शुल्क देऊन जावे लागेल. सुरक्षेच्या दृष्टीने असे करता येते का वा कंपनीचे कमाईवर लक्ष आहे, हे गंभीर प्रश्न आहेत. जर असे करता येत असेल तर जास्त शुल्क देऊन एखाद्या कारने या परिसरात प्रवेश केला तर विमानतळाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. या दुहेरी भूमिकेमुळे विमानतळाचे सुरक्षेवर लक्ष नसून कमाईची नियत दिसून येते. सुरक्षा भेदने सोपे नागपूर विमानतळावर टर्मिनल इमारतीपासून धावपट्टी जवळच आहे. याशिवाय पार्किंग बूथ टर्मिनल इमारतीसमोरच लावण्यात आले आहेत. येथे सीआयएसएफच्या दोन जवानांसह अन्य सुरक्षा गार्ड तैनात आहेत आणि बॅरिकेडस् लावले आहेत. अशास्थितीत सुरक्षा भेदने सोपे असून मोठी दुर्घटना टाळता येणार नाही. पूर्वी पार्किंग बूथ टर्मिनल इमारतीपासून दूर होता आणि त्यामुळे इमारत सुरक्षित होती. खासगीकरणाऐवजी श्रेणीकरणावर जास्त लक्ष विमानतळाच्या खासगीकरणाचे काम मिहान इंडिया लिमिटेडकडे आहे. त्यासाठी पाच वर्षांचा कालावधी दिला होता. पण नऊ वर्षांनंतरही खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या प्रक्रियेला गती देण्याऐवजी विमानतळ प्रशासन श्रेणीकरणावर ऊर्जा खर्च करीत आहे. एकीकडे सरकार व्हीआयपी संस्कृतीला संपविण्याच्या दिशेने काम करीत आहे, तर दुसरीकडे नागपूर विमानतळावर पार्किंगला वेगवेगळ्या श्रेणीत विभाजित करीत आहे.