शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
4
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
5
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
6
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
7
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
8
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
9
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
12
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
13
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
14
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
15
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
16
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
17
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
18
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
20
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान

नागपुरात एसीबीने बांधले हवालदाराचे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:52 IST

गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

ठळक मुद्दे२० हजारांच्या लाचेची मागणी : हुडकेश्वर पोलीस ठाण्यात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्ह्यातील एक कलम कमी करून आरोपींना अटक न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. संजय चिंतामणराव गायधने असे आरोपीचे नाव असून तो हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.तक्रारदार हे बल्लारपूर (जि. चंद्रपूर) जवळच्या ब्राम्हणी येथील गुरुनानक कॉलेजजवळ राहतात. ते लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. हुडकेश्वर परिसरात त्यांच्या वाहनाने झालेल्या अपघात प्रकरणात त्यांच्यासह त्यांच्या आतेभावा (वाहनचालका) विरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १७/ १९ कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, १३४, १७७ मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास हवालदार संजय गायधने यांच्याकडे होते. या गुन्ह्यात त्यांना तसेच त्यांच्या आतेभावाला अटक न करता गुन्ह्यातील एक कलम कमी करण्यासाठी गायधनेने तक्रारदाराला २० हजारांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम मिळाल्यास ठाण्यातूनच जामीन देऊ, असेही म्हटले होते. लाचेची रक्कम द्यायची नसल्याने तक्रारदाराने येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तक्रार नोंदवली. त्यावरून एसीबी अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. आज पहाटे लाचेची रक्कम घेऊन गायधनेने तक्रारदाराला पोलीस ठाण्याजवळ बोलविले. तक्रारदार आणि त्यांचा आतेभाऊ मंगळवारी सकाळी ९ वाजता पोलीस ठाण्यात पोहचले असता गायधने त्यांना घेऊन बाजूच्या सांस्कृतिक भवनाजवळच्या चौकात गेला. तेथे त्याने लाचेची रक्कम स्वीकारताच बाजूलाच घुटमळणाºया एसीबीच्या पथकाने गायधनेला पकडले. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.एसीबीचे प्रभारी उपायुक्त श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे, नायक रविकांत डहाट, मनोज कारणकर, मंगेश कळंबे, सहायक फौजदार परसराम शाही आदींनी ही कामगिरी बजावली.त्याला दिले माझे काय?कार अपघातात दुचाकीचालकाला किरकोळ दुखापत झाली होती आणि दुचाकीचेही नुकसान झाले होते. अपघाताच्या वेळी तक्रारकर्ते (कारमालक) बाजूला बसून होते. तर, कार त्यांचा आतेभाऊ चालवत होता. अपघातानंतर तक्रारकर्त्याने जखमीच्या उपचाराचा खर्च करून त्याच्या दुचाकीचेही नुकसान भरून देणार असे सांगितले होते. त्यामुळे त्यांच्यात समेट झाला होता. तरीसुद्धा हवालदार गायधने या प्रकरणाला गंभीर गुन्ह्याचे स्वरूप असल्याची बतावणी करून तक्रारदाराला त्रास देत होता. आमच्यात समेट झाला मी त्याचे (जखमीचे) नुकसान भरून दिले, असे तक्रारकर्त्याने गायधनेला सांगितले होते. त्यावर गायधनेने ‘त्याला दिले, माझे काय’, असे म्हणत २० हजारांसाठी तक्रारदाराला त्रास देणे सुरू केले होते. तक्रारकर्त्यांनी गायधनेला पाच हजार रुपये देण्याची तयारी दाखवली असता, भीक देतो का, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली होती. त्याचमुळे कंटाळलेल्या तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली अन् अखेर गायधनेला एसीबीच्या सापळ्यात अडकवले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPolice Stationपोलीस ठाणे