शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

प्रेमात तो झाला वेडापिसा...आणि...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 15:32 IST

Nagpur News विवाहित महिलेच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देविवाहित महिलेवर जबरदस्तीआत्महत्या करण्याचाही प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विवाहित महिलेच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली.

दीपक संजय पाटील (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. तो जळगाव जिल्ह्यातील येनगाव (बोदवड) येथील रहिवासी आहे. बेलतरोडीतील दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षाच्या एका महिलेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. नंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला पाटील गेल्यावर्षी नागपुरात आला. त्याने महिलेशी संपर्क साधून तिचा पत्ता जानून घेतला आणि तिच्या घरी पोहोचला. तेथे त्याने जाणे-येणे वाढवल्याने या दोघांचे सूत जुळवले. बरेच दिवस त्यांचे अनेतिक संबंध गुपचूप सुरु होते. ३० जुलै २०२० ला त्याने या महिलेला जळगावला पळवून नेले. महिलेच्या नवऱ्याने बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाईल वरून माग काढून जळगाव गाठले. तेथे त्यांनी महिलेला विचारपूस केली असता मी स्वमर्जीने पाटीलसोबत आली आणि आता मला परत यायचे नाही. पाटील सोबतच राहायचे आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे पोलीस हात हलवत परत आले.

दरम्यान, तब्बल सात महिने हे दोघे जळगावला पती-पत्नी सारखे राहत होते. नंतर त्यांच्यात खटके उडाल्याने तीन आठवड्यापूर्वी ही महिला नागपुरात आपल्या घरी परतली. मोठ्या मनाच्या नवऱ्यानेही तिला स्विकारले आणि घरी ठेवून घेतले. सर्व सुरळीत असताना आता तीन दिवसांपूर्वी पाटील पुन्हा नागपुरात परतला. त्याने महिलेचे घर गाठले. तेथेच दोन दिवस मुक्काम ठोकला आणि तिला सोमवारी दुपारी आपल्या सोबत जळगावला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागला. महिलेने नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी वाद घालून तिच्या घरातील भाजी कापण्याच्या चाकूने आपल्या दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरडाओरड केली. तर तिच्या पतीने बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार विजय आकोत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचून जखमी आरोपी पाटीलवर उपचार करून घेतले. त्यानंतर महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून त्याने आरोपी पाटील विरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.

... हिच्यावाचून करमेना !

पोलिसांनी आरोपी पाटीलला विचारणा केली असता त्याने ''हिच्या वाचून मी जगू शकत नाही. मला करमतच नाही,'' असे सांगितले. पोलिसांनी त्याची कशीबशी समजूत घालून त्याला जळगावला पाठवून दिले.

---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी