शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'तो' तब्बल ३० वर्षांनंतर झोपला अन् आईने पेढेच वाटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 10:57 IST

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने दीपकवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केली. त्याला नवे जीवन, नवी ओळख दिली. मुलाला पहिल्यांदाच निवांत झोपलेले पाहत त्याच्या आईने अख्य्खा हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले.

ठळक मुद्देडेंटल हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया युवकाला मिळाले नवे जीवन

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीपकच्या जबड्याचा विकासच झाला नसल्याने त्या मागून गेलेली श्वासनलिका दबल्या गेली होती. श्वास घेणे अडचणीचे जात होते. तो झोपला की जबडा मागे सरकायचा आणि तासाभरातच श्वास कोंडून उठून बसावे लागायचे. तब्बल ३० वर्षे तो निवांत झोपलाच नव्हता. या आजारावरील उपचारासाठी काही खासगी हॉस्पिटलने नाकारले होते. परंतु शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने दीपकवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया केली. त्याला नवे जीवन, नवी ओळख दिली. याचा सर्वाधिक आनंद त्याच्या आईला झाला. मुलाला पहिल्यांदाच निवांत झोपलेले पाहत तिने अख्य्खा हॉस्पिटलमध्ये पेढे वाटले.दीपक मिसेकर (३१) रा. विश्वकर्मानगर असे त्या युवकाचे नाव. दीपकला जन्मजात ‘ट्रॅचर कॉलिन्स सिंड्रोम’ हा आजार होता. या आजारात वरच्या आणि खालच्या दोन्ही जबड्याचा व गालाच्या हाडाचा विकास होत नाही. यामुळे जबडे मागे आणि डोळे खाली ओढलेले दिसतात. जबड्याचा विकास न झाल्याने त्यामागून गेलेली श्वासनलिका दबल्या गेली होती. दीपक अंथरुणावर झोपला की तासाभरात त्याचा श्वास कोंडायचा. त्याला उठून बसावे लागायचे. दिवसा खुर्चीवर बसला की लगेच पेंगायचा. जोरजोरात घोरायचा. त्याला ‘अ‍ॅडव्हान्स स्लीप अ‍ॅपनिया’ही (निद्रानाश) झाला होता. श्वासनलिका अरुंद झाल्याने मेंदूला आॅक्सिजनचा कमी पुरवठा व्हायचा. जेवण गिळतानाही त्रास व्हायचा. कानाने कमी ऐकू यायचे. विद्रूप चेहरा आणि झोपेच्या समस्येने तो त्रासून गेला होता. दीपकला वडील नाही. सीताबर्डीत चहाची टपरी चालवून त्याची आई कसेतरी घर चालविते. मुलाच्या या आजाराने तिचेही जगणे कठीण झाले होते. उपचारासाठी तिने अनेक खासगी डॉक्टरांना दाखविले. परंतु काहींनी दहा लाखांचा खर्च व जीविताचा धोका तर काहींनी चक्क नकार दिला होता. तिला कोणीतरी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (डेंटल हॉस्पिटल) जाण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात मुख शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अभय दातारकर व दंत व्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डॉ. वसुंधरा भड यांंना दाखविल्यावर, त्यांनी उपचाराची हमी देत, दीपकला नवे जीवन दिले.

अशी झाली शस्त्रक्रियादीपकची दबलेली श्वासनलिका मोकळी करण्यासाठी ‘आॅर्थोग्नॅथिक’ शस्त्रक्रियेद्वारे जबडा समोर आणला जाणार होता. परंतु त्यासाठी जागा तयार करायची होती. यासाठी दीपकचे समोर आलेले दात सरळ करण्यात आले. दोन्ही जबडे मागून कापून तिथे प्लेट बसविण्यात आली. यामुळे साधारण आठ मिलीमीटर जबडा समोर आला. श्वासनलिकेवरील दाब कमी झाला. हनुवटी १० मिलीमीटर समोर आल्याने चेहऱ्याची ठेवण बदलली. एक नवा चेहराही मिळाला.

५० हजारात एक रुग्णडॉ. भड म्हणाल्या, साधारण ५० हजारात या आजाराचा एक रुग्ण आढळतो. हा आनुवंशिक आजार आहे. या आजारासोबत जगणे फार कठीण असते. डॉ. दातारकर म्हणाले, ही एक दुर्मिळ व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. या यशस्वी शस्त्रक्रियेने दीपकला नवीन जीवन मिळाल्याचे समाधान आहे.रुग्णालय वेगळी ओळख निर्माण करतेशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय केवळ दाताच्या आजारापुरतेच मर्यादित नाही तर मुखाच्या आजारावरही उपचार करते. गेल्या काही वर्षात या सारख्या अनेक शस्त्रक्रिया होऊ घातल्या आहेत. हे रुग्णालय आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे.-डॉ. सिंधू गणवीर, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय 

टॅग्स :Healthआरोग्य