शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

...शेवटी तो ‘बळी’राजाच : विदर्भात रोज चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By योगेश पांडे | Updated: December 10, 2023 23:57 IST

सरकार कुणाचेही असो, बळीराजाच्या नशिबी मरणयातनाच : दशकातील आत्महत्यांचा परमोच्च बिंदू पावणेतीन वर्षांत

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यात वर्षातून तीनदा विधिमंडळाचे अधिवेशन होते व बहुतांश वेळा शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरच गोंधळ होतो. मात्र सरकार कुठलेही असले तरी प्रत्यक्षात बांधावरील शेतकऱ्याला मात्र दिलासा मिळत नसल्याचेच चित्र आहे. या वर्षभरात विदर्भात दर दिवसाला सरासरी चारहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. दुर्दैवाची बाब म्हणजे मागील दशकभरातील आकडेवारीचा परमोच्च बिंदू मागील पावणेतीन वर्षांतच दिसून आला आहे. विदर्भाच्या भूमीत अधिवेशन होत असताना ही आकडेवारी सत्ताधारी व विरोधकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन टाकणारी आहे.

शेतकऱ्यांच्या मरणयातनेवर राजकारण बाजूला ठेवून शाश्वत उपाययोजनांवर मंथन करतील का, असा सवाल उपस्थित होत आहे. ‘लोकमत’ला विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०२३ साली विदर्भातील अमरावती विभागात १० महिन्यांतच ९५१ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील २५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. १० महिन्यांत विदर्भात १ हजार २०८ शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे स्वत:चा जीव द्यावा लागला. सरासरी दररोज चार शेतकऱ्यांनी इहलोकाचा निरोप घेतला.

-पावणेतीन वर्षांत सव्वाचार हजारांहून अधिक आत्महत्या

कोरोनाचे कुचक्र सुरू झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना घोषित केल्या. मात्र कधी अवकाळी तर कधी दुष्काळ, कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात शेतकरी अडकतच गेला. जानेवारी २०२१ ते ऑक्टोबर २०२३ या ३४ महिन्यांच्या कालावधीतच विदर्भात ४ हजार ३३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात अमरावती विभागातील सर्वाधिक ३ हजार ३३१ शेतकऱ्यांचा समावेश होता. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले.

-२५ हजारांचा आकडा पार, २०२२ मध्ये सर्वाधिक आत्महत्या

२००१ सालापासून विदर्भात २५ हजार ४२५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात नागपूर विभागातील ५ हजार ५०८ तर अमरावती विभागातील १९ हजार ८१७ आत्महत्यांचा समावेश आहे. जर दशकभराच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर २०२० नंतर आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढत गेले. २०२२ मध्ये सर्वाधिक १ हजार ५६३ तर २०२१ मध्ये १ हजार ५६० शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले.

-खरिपाच्या काळात सर्वाधिक दाहकता

यंदा शेतकऱ्यांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यावर पावसाने पाठ फिरवली व अनेक जिल्ह्यांमध्ये दुबार पेरणीची वेळ आली. यात शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले. सप्टेंबर महिन्यात १३६ तर ऑगस्ट महिन्यात १३० शेतकऱ्यांनी जीव दिला.

-२०२३ मधील महिनानिहाय दाहकतामहिना : आत्महत्याजानेवारी : १२९फेब्रुवारी : ९६मार्च : १२६एप्रिल : १०८मे : १२०जून : ११४जुलै : १२२ऑगस्ट : १३०सप्टेंबर : १३६ऑक्टोबर : १२७

-२०२१ पासूनच्या आत्महत्यावर्ष : आत्महत्या२०२१ : १,५६०२०२२ : १,५६३२०२३ (ऑक्टोबरपर्यंत) : १,२०८

टॅग्स :Vidarbhaविदर्भFarmerशेतकरी