शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

संशोधनाचा ध्यास घेतलेला बालवैज्ञानिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:42 IST

मानवी जीवन सुकर करणे हेच विज्ञानाचेही ध्येय आहे. ते कसे उपयोगी पडते याचे उदाहरण नागपूरच्या खुशाल देवगडे या नववीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.

ठळक मुद्देसायकल पंपने शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्थाराज्यस्तरावर धडक, केंद्राची शिष्यवृत्ती

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे, हे विज्ञान शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. एकदा का त्यांच्यात ही दृष्टी निर्माण झाली की मग समाजोपयोगी अनेक संशोधन त्यांच्या प्रतिभेतून जन्माला येतात; कारण मानवी जीवन सुकर करणे हेच विज्ञानाचेही ध्येय आहे. ते कसे उपयोगी पडते याचे उदाहरण नागपूरच्या खुशाल देवगडे या नववीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. शेताला पाणी देण्यासाठी विजेवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशालने इलेक्ट्रीसिटीऐवजी सायकलमध्ये हवा भरणाºया पंपच्या प्रेशरने शेतामध्ये ठिबक सिंचनाचे तंत्र विकसित केले आहे. त्याचे हे मॉडेल राज्यस्तरापर्यंत धडकले असून, केंद्राच्या योजनेतून त्याला शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.खुशाल हा राजेंद्र हायस्कूल, महाल येथील नववीचा विद्यार्थी. वडील महेंद्र देवगडे हे मेकॅनिक म्हणून काम करतात. त्यांच्याकडूनच नवप्रवर्तनाची प्रेरणा खुशालला मिळाली असावी. शाळेत तसा अ‍ॅव्हरेज विद्यार्थी असलेला खुशाल टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी जोडतोड करून नवीन घडविण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याच कल्पनेतून ‘हवेच्या दाबाद्वारे तुषार आणि ठिबक सिंचन’ हा प्रयोग साकार झाला. रोहित ठोंबरे आणि सचला भांगे या शिक्षकांच्या मार्गदर्शनात त्याच्या या कल्पनेला आकार मिळाला.असे होईल ठिबक सिंचनया प्रयोगात हवापंप, निरुपयोगी प्लास्टिक प्लम्बिंग पाईप, रबर पाईप, पेंटच्या रिकाम्या बादल्या, सायकलचे चाक, रबर वॉशर, कॉटन रस्सी आदींचा उपयोग केला आहे. बादलीने विहिरीचे पाणी काढतो तसे वॉटर पुलीने प्रेशर देउन विहिरीचे पाणी वर आणले जाईल. या तंत्राने निव्वळ प्रेशरने विहिरीचे पाणी ३० ते ४० फूट वर ओढले जाऊ शकत असल्याचे खुशालने सांगितले. वर आलेले पाणी एका एअर टाईट टॅँकमध्ये जमा होईल. टॅँकला ठिबक सिंचनाची व्यवस्था असलेले लहान पाईप जोडायचे. यानंतर हवापंपद्वारे हवा भरून टॅँकमध्ये एअर प्रेशर निर्माण केल्यानंतर पाणी ठिबक सिंचनाने शेतात पोहचेल. या तंत्राने तुषार सिंचनाची सोय करून उद्यानाला ओलावा दिला जाऊ शकतो. या तंत्राने इलेक्ट्रीसिटीची गरज पडणार नाही आणि शेतकºयांना रात्री-बेरात्री पाणी देण्यासाठी जावे लागणार नाही.इतरही उल्लेखनीय प्रयोगखुशालने याच हवापंपाच्या प्रेशरद्वारे रॉकेट लॉन्चर तयार केले होते. याद्वारे शेतात कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ शकते, असा दावा त्याने केला होता. याशिवाय पावसाने बाहेर साठविलेले धान्य खराब होऊ नये म्हणून सेन्सर पॉलिथीन कव्हर त्याने तयार केले.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थी