शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वेदनातून सुटका करून घेण्यासाठी त्याने जीव दिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 21:35 IST

वारंवार औषधोपचार करूनही जीवघेण्या वेदनापासून आराम मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही करुण घटना घडली.

ठळक मुद्देमानकापुरातील असहाय तरुणाची आत्महत्या : परिसरात हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वारंवार औषधोपचार करूनही जीवघेण्या वेदनापासून आराम मिळत नसल्यामुळे वैतागलेल्या एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही करुण घटना घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अक्रम खान इज्राइल खान (वय ३२) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर झोपडपट्टी (गल्ली नंबर ७) मध्ये राहत होता.पोलिसांच्या माहितीनुसार, अक्रमला आई-वडील नाही. तो त्याची वृद्ध आजी असे दोघे जण स्वत:च्या घरात राहत होते. काही महिन्यापूर्वी त्याला अपघात झाला. अपघातात दोन्ही पायांना जबर दुखापत झाली. त्यावर त्याने घरातील होते नव्हते ते सगळे खर्ची घालून उपचार केले. मात्र त्याच्या पायातील वेदना थांबत नव्हत्या. तो अनेकदा अक्षरश: वेदनांनी ओरडायचा आणि जवळ आलेल्या प्रत्येकाला या वेदना सहन होत नाही, असे सांगायचा. अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने त्याची वृद्ध आजी काही दिवसापूर्वी आर्वी येथील नातेवाईकाकडे गेली. त्याच्या घरात भाड्याने राहणारे त्याला दोन वेळेचे जेवण आणि चहा देत होते. भूक भागायची मात्र त्याच्या वेदना काही थांबत नव्हत्या. त्यामुळे त्याने सोमवारी दुपारी २ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर