लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर केरळ पूर पीडितांना आर्थिक मदत करणार आहे. त्याकरिता वकिलांकडून धनादेश स्वीकारले जात आहेत. ७ सप्टेंबरनंतर सर्व धनादेश मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीमध्ये जमा केले जाणार आहेत.असोसिएशनने स्वत:च्या खात्यातील एक लाख रुपये दिले आहेत. तसेच, असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी एकूण ७१ हजार रुपये तर, कर्मचाऱ्यांनी ११ हजार रुपये गोळा गेले आहेत. वकिलांमधून आतापर्यंत वरिष्ठ वकील एम. जी. भांगडे यांनी २ लाख, अॅड. शशिभूषण वाहणे व अॅड. राधेश्याम अग्रवाल यांनी प्रत्येकी ५ हजार, अॅड. अरविंद वाघमारे यांनी ११०१ तर, अॅड. लक्ष्मणसिंग मोहता यांनी ५०० रुपयांचा धनादेश असोसिएशनकडे जमा केला आहे.सामाजिक जबाबदारी जपतोहायकोर्ट बार असोसिएशन ही सामाजिक जबाबदारी जपणारी संघटना आहे. ही संघटना आतापर्यंत अनेकदा समाजाच्या मदतीसाठी धावून गेली आहे. केरळ पूर पीडितांच्या मदतीसाठी बँकेत रक्कम जमा केल्यानंतर केरळचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांना याची माहिती दिली जाईल.अॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, एचसीबीए.‘डीबीए’ही गोळा करणार मदतडिस्ट्रिक्ट बार असोसिएशन (डीबीए)देखील केरळ पूर पीडितांना आर्थिक मदत करणार आहे. तसेच, अन्य वकिलांना मदतीचे आवाहन करणारे पत्र लवकरच जारी केले जाणार आहे. संघटनेचे सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांनी ही माहिती दिली.महिला वकील पुढेकेरळ पूर पीडितांना आर्थिक मदत करण्यासाठी विदर्भ महिला वकील संघटनासुद्धा पुढे आली आहे. ही संघटना वकिलांकडून मदत गोळा करीत आहे. तसेच, ते महिला पूरपीडितांना वस्त्रे देणार आहेत. महिला वकिलांनी मोठ्या संख्येत केरळला सहकार्य करावे असे आवाहन संघटनेने केले आहे.
एचसीबीए, डीबीए करणार केरळला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:40 IST
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर केरळ पूर पीडितांना आर्थिक मदत करणार आहे. त्याकरिता वकिलांकडून धनादेश स्वीकारले जात आहेत. ७ सप्टेंबरनंतर सर्व धनादेश मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीमध्ये जमा केले जाणार आहेत.
एचसीबीए, डीबीए करणार केरळला मदत
ठळक मुद्देधनादेश स्वीकारणे सुरू : मुख्यमंत्री निधीत जमा करणार रक्कम