शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

अण्णा टोळीचा हैदोस

By admin | Updated: March 17, 2017 03:03 IST

वाहनाच्या बाजूला तुमची रक्कम पडून आहे, अशी बतावणी करून वाहनातील रोकड अन् मौल्यवान चिजवस्तू

नोटा पडल्याची बतावणी : वाहनातून रोख व चिजवस्तू लंपास, सव्वा तासात तीन घटना नागपूर : वाहनाच्या बाजूला तुमची रक्कम पडून आहे, अशी बतावणी करून वाहनातील रोकड अन् मौल्यवान चिजवस्तू लंपास करणाऱ्या अण्णा टोळीने उपराजधानीत गुरुवारी अक्षरश: हैदोस घातला. अवघ्या सव्वा तासात तीन वाहनांमधून रोकड आणि पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास केला. महाबँक चौक : ११. ३० वाजता शांतिनगरातील रहिवासी धर्मराज शंकर कराडे (वय २८) हे गुरुवारी सकाळी ११.३० वाजता महाबँक चौकात आले. त्यांनी हल्दीरामच्या बाजूला आपली इनोव्हा कार (एमएच ४९/ बी ९८३०) लावली. नाश्ता वगैरे घेतल्यानंतर ते कारमध्ये येऊन बसले असता अंदाजे २५ ते ३० वयोगटातील एक तरुण त्यांच्याजवळ आला. तुमचे पैसे खाली पडले आहे, असे त्याने सांगितले. त्यामुळे कराडेंनी कारच्या खाली उतरून पाहणी केली. तेवढ्या वेळेत आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी कराडेच्या कारमधील बॅग (ज्यात ८० हजारांचा लॅपटॉप होता) लंपास केली. कराडे यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला. रामदासपेठ : दुपारी १२ वाजता शुभम प्रकाश कोरपे (वय २२, रा. संजय गांधीनगर, हुडकेश्वर) गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास रामदासपेठेत आले. त्यांनी आपली झेन कार (एमएच ३०/ पी ४३७) रामदासपेठेतील सोमलवाडा शाळेजवळ उभी केली. ते कारमध्ये बसून असताना २५ ते ३० वयोगटातील एका आरोपीने काचेला ठोकून कोरपेंचे लक्ष वेधले. त्यामुळे कोरपे कारचे दार उघडून बाहेर आले. आरोपीने त्यांना असंबंद्ध माहिती विचारली. त्यानंतर कोरपे कारमध्ये बसले तेव्हा त्यांना कारमधील ३० हजारांचा लॅपटॉप असलेली बॅग आणि कागदपत्रे चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चोरीचा ग ुन्हा नोंदविला. अजनी चौक : दुपारी १२.४५ वाजता क्रीडा चौकातील रहिवासी कुसूम सुरेश कोल्हे (वय ५६) या त्यांच्या कारने गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता वर्धा मार्गावरील अजनी चौकात आल्या होत्या. अ‍ॅक्सिस बँकेसमोर त्या कारमध्ये बसून असताना एक अनोळखी आरोपी त्यांच्याजवळ आला. तुमच्या कारजवळ पैसे पडलेले आहे, असे सांगून त्याने कोल्हे यांचे लक्ष विचलित केले. त्यानंतर कारमध्ये सिटवर ठेवलेली हॅन्डबँग ज्यामध्ये रोख ५० हजार, मोबाईल तसेच एटीएम कार्डसह एकूण ७१ हजारांच्या चिजवस्तू होत्या, ती चोरून नेली. त्यांनी धंतोली ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवली. धंतोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला.