शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हवाला-डब्बा व्यापाऱ्यांची दुसऱ्या दिवशीही चौकशी; शेल कंपनीतून आर्थिक पुरवठा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 11, 2023 18:35 IST

Nagpur News मुंबईच्या आयकर अधिकाऱ्यांची हवाला आणि डब्बा व्यापाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू होती. अकरा जणांची २० हून अधिक कार्यालये आणि निवासस्थानांची सखोल तपासणी केली.

नागपूर : मुंबईच्या आयकर अधिकाऱ्यांची हवाला आणि डब्बा व्यापाऱ्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरू होती. अकरा जणांची २० हून अधिक कार्यालये आणि निवासस्थानांची सखोल तपासणी केली. रोखीसह कोट्यावधींच्या अवैध आर्थिक व्यवहाराची संशयास्पद कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती आहे. ही कारवाई शुक्रवारीही सुरू राहण्याची शक्यता आहे. 

नागपूरच्या आयकर अधिकाऱ्यांना टाळलेडब्बा व्यावसायिक रवी अग्रवाल याच्यासोबत असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे मुंबईच्या आयकर अधिकाऱ्यांनी नागपूरच्या अधिकाऱ्यांना कारवाईत सहभागी करून घेण्यास टाळले. त्यामुळे नागपूरच्या आयकर अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागपूरच्या अनेक आयकर अधिकाऱ्यांनी त्याच्या छत्तरपूर फॉर्मचा अर्थपूर्ण दौरा केल्याची माहिती आहे. काही अधिकाऱ्यांची नावे कारवाईदरम्यान उजेडात आली असून त्यांचीही चौकशी होणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.

यांच्यावर झाली कारवाईरवी अग्रवाल, शैलेश लखोटिया, पारस जैन, लाला जैन, करण थावरानी, प्यारे खान, गोपी मालू, अक्षद लुणावत, हेमंत तन्ना, इजराईल सेठ आणि सीए रवी वानखेडे अशा अकरा जणांवर छापेमार कारवाई झाली आहे. 

कोलकात्यात नॉन बँकिंग फायनान्स कंपनीरवी अग्रवालची कोलकात्यात नॉन फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) आहे. या ह्यशेलह्ण कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहाराची माहिती आयकर विभागाला मिळाली आहे. रवी नागपुरात बसून लोकांना ३ ते ४ टक्के दराने फायनान्स करीत होता. या माध्यमातून त्याच्या जाळ्यात अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आल्याचा संशय आयकर अधिकाऱ्यांना आहे. त्याच्या एफबीएफसीचा पत्ता मुंबई आहे, तर त्याने कंपनीची कामे कोलकाता येथून होत असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय त्याच्या एल७ कंपनीचा अवैध आर्थिक व्यवहारात मोठा वाटा आहे. या कंपनीच्या माध्यमातून तो डब्बा व्यवसाय चालवित होता.

अनेक बिल्डर रवीच्या जाळ्यातरवी अग्रवालच्या जाळ्यात नागपुरातील काही बिल्डरही अडकले आहेत. त्यांनी रवीकडून कोट्यवधीं उचल केली आहे. या व्यवहाराची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय रवी अग्रवालच्या छत्तरपूर फॉर्ममध्ये अनेक करोडपती, मोठे अधिकारी, बुकी आणि काही व्यापाऱ्यांनी व्हिला खरेदी केले आहेत. त्यांचीही नावे अधिकाऱ्यांच्या रडावर आली आहेत.

प्यारे खानची होणार व्यापक चौकशीकधी काळी ऑटो चालवून कुटुंबाचे पालनपोषण करणारा प्यारे खान कमी कालावधीत कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक बनला आहे. ही संपत्ती त्याने कुठून व कशी मिळविली, याचा शोध अधिकारी घेत आहेत. ताजाबाद ट्रस्टचा अध्यक्ष असून आता आयकरच्या जाळ्यात अडकला आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स