लाेकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : ‘पाॅर्न क्लिप’ पाहून सेक्स करणे नागपूर शहरातील एका प्रेमीयुगुलाला जीवघेणे ठरले. यात तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथील एका हाॅटेलच्या खाेलीत गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. नागपुरातील टेकानाका परिसरात राहणाऱ्या तरुणाचे हबीबनगर, टेकानाका, नागपूर येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध हाेते. हा २७ वर्षीय तरुण इंजिनिअर असून, बेराेजगार हाेता. ती तरुणी नागपूर शहरातील एका खासगी कंपनीत नाेकरी करते. दाेघेही गुरुवारी सायंकाळी दहेगाव (रंगारी) परिसरात फिरायला आले. सेक्स करण्यासाठी त्यांनी दहेगाव (रंगारी) परिसरातील महाराजा लाॅजमध्ये एक खोली बुक केली. त्या खाेलीत दाेघांनीही माेबाईलवर ‘पाॅर्न क्लिप’ बघितली. त्यांनी त्या ‘क्लिप’मधील पद्धतीने सेक्स करायला सुरुवात केली. ताे तरुण खुर्चीवर बसला. त्याचे दाेन्ही हात व पाय दाेरीने बांधले हाेते. गळ्यालाही दाेरीने फास बांधला हाेता. सेक्स आटाेपल्यानंतर तरुणी बाथरूमध्ये गेली. याचदरम्यान तोल गेल्याने तरुण खुर्चीवरून खाली पडला. त्यातच गळ्याला बांधलेल्या दाेरीचा फास आवळला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ती बाथरूममधून बाहेर येताच हा प्रकार तिच्या लक्षात आला. तिने लगेच लाॅज व्यवस्थापकाला माहिती दिली. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी त्या तरुणीच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा करीत आहेत.
पॉर्न क्लिप पाहून सेक्स करणे जीवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:02 IST
Parn Clip, sex lost life ‘पाॅर्न क्लिप’ पाहून सेक्स करणे नागपूर शहरातील एका प्रेमीयुगुलाला जीवघेणे ठरले. यात तरुणाचा गळफास लागून मृत्यू झाला.
पॉर्न क्लिप पाहून सेक्स करणे जीवावर बेतले
ठळक मुद्देतरुणाचा गळफासाने मृत्यू : दहेगाव येथील घटना