जितेंद्र ढवळे
नागपूर : घरातील सदस्यांसारखा जपल्या जाणाऱ्या ‘डॉगी’च्या आरोग्याची काळजी आता केवळ प्रेमापुरती मर्यादित राहिलेली नाही. वाढत्या उपचार खर्चाच्या पार्श्वभूमीवर पाळीव कुत्र्यांसाठी मेडिक्लेम विमा योजना उपलब्ध होत असून, गंभीर शस्त्रक्रिया, अपघातातील उपचार आणि अगदी कुत्र्याने एखाद्याला चावा घेतल्यास तृतीय पक्षाला भरपाई देण्याची तरतूदही या योजनांमध्ये आहे.
प्रीमियम किती?
कुत्र्याच्या जाती, वय आणि बाजारमूल्यानुसार प्रीमियम ठरतो. साधारणपणे विविध पॅकेजनुसार वार्षिक प्रीमियम दोन हजार ते २५ हजार रुपये इतका पडतो. यात साधारणतः वार्षिक ४० हजार ते १.५० लाखापर्यंतचे कव्हर मिळू शकते.
नागपुरातील पशुवैद्यक महाविद्यालयात भारतीय श्वान चिकित्सक संघटनेचे तीन दिवसीय वार्षिक अधिवेशन नुकतेच झाले होते. यात आहारापासून ते त्यांचा मेडिक्लेम कसा काढला जाऊ शकतो, याची माहिती देण्यासाठी विविध स्टॉल्स लावण्यात आले होते.
पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावरील अनपेक्षित खर्च आर्थिक ताण निर्माण करू शकतो. त्यामुळे ‘पेट इन्शुरन्स’ हा पर्याय पुढील काळात अधिक लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.
स्मिता तळोकार, प्रमुख,
प्राॅडक्ट मॅनेजमेंट, व्हेटिना हेल्थकेअर
श्वानांना होणारे ९ प्रकारचे क्रिटिकल आजार, स्पेसिफिक आजार (४७), ओपीडी (२१ आजार), थर्ड पार्टी लायबिलिटी, स्पेशलाइज थेरपीअंतर्गत १४ प्रकारचे उपचार केले जातील. यात श्वानावर होणाऱ्या शस्त्रक्रियांवर होणारा ८० टक्के खर्च कंपनीकडून दिला जाईल.
कुत्रा चावल्यासही भरपाई
कुत्र्याने एखाद्याचा चावा घेतल्यास विमा कंपनीकडून तृतीय पक्षाला भरपाईची तरतूद मेडिक्लेममध्ये आहे. यात पोलिस अहवालाचा आधार घेतला जाईल. महानगरांत पाळीव प्राण्यांच्या संख्येमुळे हा पर्याय विशेष महत्त्वाचा ठरत आहे.
Web Summary : Dog mediclaim plans now cover surgeries, accidents, and third-party liability for dog bites. Premiums range from ₹2,000 to ₹25,000 annually, covering ₹40,000 to ₹1.5 lakh. Policies include critical illnesses, specific ailments, and even compensation if your dog bites someone.
Web Summary : कुत्ते के मेडिक्लेम में सर्जरी, दुर्घटनाएं और कुत्ते के काटने पर थर्ड-पार्टी देयता शामिल है। प्रीमियम ₹2,000 से ₹25,000 सालाना है, जिसमें ₹40,000 से ₹1.5 लाख तक का कवर मिलता है। नीतियों में गंभीर बीमारियां, विशिष्ट बीमारियां और यहां तक कि मुआवजा भी शामिल है यदि आपका कुत्ता किसी को काटता है।