११ ठिकाणी कारवाई : इमामवाड्यात तणाव: मनपा व पोलीस विभागाची कारवाईनागपूर : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी शहराच्या विविध भागात विरोधाला न जुमानता फुटपाथवर अतिक्रमण करून बांधलेली ११ धार्मिक स्थळे हटविली. यात लहान- मोठ्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना लोकांचा विरोध होणार हे गृहितच होते. त्यामुळे आधीच तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दुपारी २ च्या सुमारास धंतोली झोनमधील इमामवाडा येथील धार्मिक स्थळाजवळ पथक पोहचले. फुटपाथवरील धार्मिक स्थळाचे प्रवेश व्दार तोडण्याला सुरुवात करताच काही लोकांनी याला विरोध दर्शविला. यामुळे वाद निर्माण झाला होता. परंतु उच्च न्यायालयाचे निर्देश असल्याची माहिती दिल्यानंतर व पोलीस बंदोबस्तामुळे लोक शांत झाले. त्यानंतर अतिक्रमण हटविण्यात आले. नंतर पथकाने गे्रटनाग रोड ,बैद्यनाथ चौक, कुंजीलालपेठ येथील फुटपाथवरील धार्मिक स्थळे हटविली. तसेच मंगळवारी झोनच्या पथकाने कडबी चौकातील गुरुबक्षानी यांच्या घराजवळ, छिंदवाडा मार्गावरील एनएडीटी कम्पाऊ ड, अनंतनगर येथील बॅकेजवळ, गोरेवाडा रिंगरोडवरील स्वागतनगर, गंगानगर झोपडपट्टी, गिट्टीखदान मासोळी बाजार व छावणी चौकातील धार्मिक स्थळे हटविली. धंतोली झोनच्या पथकाने धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटवितानाच रामबाग, मेडिकल चौकातील फळविक्रे त्यांनी अतिक्रमण करून थाटलेली दुकाने हटविली. तसेच अजनी रोड, चंद्रमणीनगर, कुंजीलालपेठ, रामेश्वरी चौक ते शताब्दीनगर चौक दरम्यानच्या मार्गावरील ८५ अतिक्रमण हटविले. पथकाने दोन ट्रक साहित्य जप्त केले. (प्रतिनिधी)लक्ष्मीनगरात जप्तीची कारवाईलक्ष्मीनगर झोनच्या पथकाने माटे चौकातील १० अतिक्रमण हटविले. विक्रे त्यांचे साहित्य जप्त करून दंड वसूल केला. त्यानंतर जयप्रकाशनगर येथील सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घराची संरक्षक भिंत हटविली. छत्रपती चौक, नरेन्द्र नगर पुलाजवळील अतिक्रमण हटविले. वर्धा मागांवरील साई मंदिराजवळील फुटपाथवर सजविण्यात आलेले २५ रोल जप्त करण्यात आले. अजनी चौकातील फळविके्र त्यांचे अतिक्र मण हटवून साडेचार हजाराचा दंड वसूल केला. ही कारवाई अधीक्षक अभियंता अरुण पिपरुडे, हटवार, भाजीपाले, मंजू शाह, जमशेट अली, एस. बी. बागडे, शरद इरपाते व पोलीस पथकाने केली.
धार्मिक अतिक्रमणावर हतोडा
By admin | Updated: May 19, 2015 02:01 IST