शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर गुणकारी असलेल्या पानपिंपरीला येणार सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 14:01 IST

Amravati News कोरोनावर गुणकारी औषध म्हणून पानपिंपरी उपयोगात आणले जात आहे. त्यामुळे पिकाच्या दरात तेजी राहणार, हे निश्चित आहे.

ठळक मुद्दे सहा वर्षांपासून कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये होती अस्वस्थता

मनोहर मुरकुटे

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती :  अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी सत्तर वर्षांपासून परंपरागत पद्धतीने पानपिंपरी या वनौषधी पिकाची लागवड ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सध्या मिळत असलेल्या दरामुळे गेल्या सहा वर्षांपासून हे पीक मोडीत काढण्याची भूमिका घेतलेले शेतकरी आनंदित झाले आहेत. हा दर स्थिर राहिल्यास पानपिंपरी उत्पादकांच्या कष्टाचे चीज होईल, अशा प्रतिक्रिया अंजनगाव सुर्जी परिसरात उमटत आहेत.

आठ ते दहा वर्षांपासून पानपिंपरी पिकावर सतत निसर्गाचा कोप होत आहे. शासनाचे तुटपुंजे अनुदानही दोन वर्षांपासून बंद पडले. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली. अशाही परिस्थितीत महागडे खर्चाचे पानपिंपरी हे वनौषधी पीक जिवंत ठेवण्याचे काम परिसरातील शेतकरी हे अविरत करीत आहेत. पाच, सहा वर्षांपासून या पिकाला ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. परंतु, उत्पादक कमी झाल्याने घटलेले पानपिंपरी उत्पादन व कोरोनाचा प्रभावामुळे पिकाला आयुर्वेदामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली वाढती मागणी पाहता, यावर्षी ५५० रुपये प्रतिकिलोवर दर पोहोचला. काही दिवसांत हाच दर ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची चिन्हे दिसत असल्याचे व राष्ट्रीय स्तरावरून वाढती मागणी पाहता, दरात तेजी राहणार असल्याचे व्यापारी वर्ग व शेतकऱ्यांची चर्चा जोर धरत आहे.

कोरोनावर गुणकारी औषध म्हणून पानपिंपरी उपयोगात आणले जात आहे. त्यामुळे पिकाच्या दरात तेजी राहणार, हे निश्चित आहे.

- संजय नाठे, पिपरी उत्पादक शेतकरी

आंतरराष्ट्रीय बाजारात पिकाची मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी चांगला भाव मिळत आहे. तो यापुढेदेखील वाढता राहील.

- संजय टिपरे, व्यापारी

पानपिंपरी पिकाचा उत्पादन खर्च ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दरात निघत नव्हता. अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे याच पिकाच्या भरवशावर शेतकरी होते. आताचा दर भविष्यात कायम राहिल्यास उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

- मनोहर मुरकुटे, शेतकरी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAyurvedic Home Remediesघरगुती उपाय