शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हर्षा व मिडास हॉस्पिटलचे डॉक्टर वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 21:15 IST

महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने धरमपेठेतील स्वामी आर्केडस्थित हर्षा चिल्ड्रेन हॉस्पिटल अ‍ॅन्ड मॅटेर्निटी होमचे डॉ. विद्या व डॉ. भूषण सुतावणे, रामदासपेठेतील मिडास हाईटस् हॉस्पिटलचे डॉ. राजन बारोकर आणि अ‍ॅनेस्थेटिस्ट डॉ. मनीषा काटे यांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवले आहे.

ठळक मुद्देराज्य ग्राहक आयोगाचा निर्णय : तक्रारकर्त्यांना २५ लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठाने धरमपेठेतील स्वामी आर्केडस्थित हर्षा चिल्ड्रेन हॉस्पिटल अ‍ॅन्ड मॅटेर्निटी होमचे डॉ. विद्या व डॉ. भूषण सुतावणे, रामदासपेठेतील मिडास हाईटस् हॉस्पिटलचे डॉ. राजन बारोकर आणि अ‍ॅनेस्थेटिस्ट डॉ. मनीषा काटे यांना वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी ठरवले आहे. या डॉक्टर्सनी संयुक्त किंवा विभक्तपणे तक्रारकर्त्यांना ९ टक्के व्याजासह २५ लाख रुपये भरपाई द्यावी असा आदेश आयोगाने दिला आहे. तसेच, तक्रारकर्त्यांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी एक लाख व तक्रारीच्या खर्चापोटी २५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.खंडपीठाचे अध्यक्ष बी. ए. शेख व सदस्य जयश्री येंगल यांनी हा निर्णय दिला आहे. डॉ. प्रमोद, हेमांगी व हिमांशू अमोदकर अशी या निर्णयामुळे दिलासा मिळालेल्या तक्रारकर्त्यांची नावे आहेत. २५ लाख रुपयांवर १६ जुलै २००९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंतच्या कालावधीत व्याज लागू करण्यात आले आहे. डॉक्टर्सच्या निष्काळजीपणामुळे २८ वर्षीय प्रणिता अमोदकर यांचा मृत्यू झाला. त्या जळगाव येथे प्राध्यापक होत्या व बाळंतपणासाठी नागपूर येथे माहेरी आल्या होत्या. त्यांचे प्रमोद हे पती तर, हेमांगी व हिमांशू ही अपत्ये आहेत. आयोगात तक्रारकर्त्यांतर्फे अ‍ॅड. विवेक केदार यांनी बाजू मांडली.अशी घडली घटनाप्रणिता यांना १६ जुलै २००७ रोजी बाळंतपणासाठी हर्षा हॉस्पिटलमध्ये भरती करून घेण्यात आले होते. सिझेरियन केल्यानंतर त्यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. त्यानंतर प्रणिता यांना श्वास घेण्यास अडचण होत होती व अस्पष्ट दिसत होते. परंतु, तक्रारीनंतरही डॉक्टर्सनी त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही. प्रकृती अधिक खराब झाल्यानंतर प्रणिताला मिडास हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आले. दरम्यान, नातेवाईकांनी डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार हजारो रुपयांची आवश्यक औषधे खरेदी केली. शेवटी त्याचा काहीच फायदा झाला नाही. १९ जुलै रोजी प्रणिताने जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :consumerग्राहकhospitalहॉस्पिटल