शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड : चौकीदारावर केला होता प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:03 IST

चौकीदारावर प्राणघातक हल्ला करून एका खोलीत फेकून दिल्यानंतर त्या घरातील मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

ठळक मुद्देचार महिन्यानंतर पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकीदारावर प्राणघातक हल्ला करून एका खोलीत फेकून दिल्यानंतर त्या घरातील मौल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.मनोज शालिकराम धुर्वे (वय २९, रा. आनंदनगर, जयताळा), शुभम विनय पाठक (वय २५, रा. सुदामनगरी, पांढराबोडी), अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे असून, त्यांच्यासोबत त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारही आहेत.केसरी ले-आऊट जयताळा येथील रहिवासी बाळकृष्ण भुरेवार १० मार्चला घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. तेथे शिवमोहन तिवारी (वय ५८) हे चौकीदारी करीत होते. पहाटेच्या वेळेस आलेल्या गुन्हेगारांनी तिवारी यांना लोखंडी रॉडने जोरदार मारहाण केली. ते मृत झाल्याचे समजून त्यांना फरफटत नेऊन एका खोलीत फेकले आणि घरातील टीव्हीसह ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. आरोपींनी भुरेवार यांची कारही तेथून चोरून नेली. मात्र, काही अंतरावर कार बंद पडल्याने ती तशीच सोडून आरोपी चोरलेले साहित्य घेऊन पळून गेले. कोमात गेलेल्या तिवारींवर प्रदीर्घ उपचार करून डॉक्टरांनी त्यांचा जीव वाचविला. दरम्यान, एमआयडीसीत याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस समांतर तपास करीत होते. रविवारी पोलिसांना जयताळ्यातील बाजारात एका पल्सरवर कुख्यात मनोज धुर्वे आणि शुभम पाठक दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी बोलते केले असता, ती पल्सर चोरीची असल्याचे तसेच १० मार्चला भुरेवार यांच्याकडे चौकीदार तिवारींना बेदम मारहाण करून चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे साहित्य काढून देतानाच त्यांनी या गुन्ह्यासह एमआयडीसी, प्रतापनगर आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी तसेच वाहनचोरीचे एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. आपल्या अल्पवयीन साथीदाराचेही नाव आरोपींनी पोलिसांना सांगितले.२७ गुन्ह्यांचा आरोपीकुख्यात मनोज धुर्वे हा अल्पवयीन असतानाच गुन्हेगारीत सक्रिय झाला. त्याच्यावर लुटमार, चोरी, घरफोडीचे एकूण २७ गुन्हे, तर शुभम पाठकविरुद्ध ४ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पकडल्यानंतरही ते सहजासहजी गुन्ह्यांची कबुली देत नाही.त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर, सहायक निरीक्षक प्रशांत चौगुले, उपनिरीक्षक वसंता चौरे, श्रीनिवास मिश्रा, हवलदार नरेश सहारे, नरेश रेवतकर कृपाशंकर शुक्ला, आशिष ठाकरे, रवींद्र बारई, आशिष देवरे, शिपायी सुशील श्रीवास, मंगेश मडावी, देवीप्रसाद दुबे आणि सायबर शाखेचे सुहास शिंगणे तसेच आशिष पाटील यांनी बजावली.

टॅग्स :RobberyचोरीArrestअटक