शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

शुभ गुढीपाडवा; खरेदीला नवचैतन्याचा गोडवा, कोट्यवधींची उलाढाल होणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 21, 2023 15:34 IST

सराफा, आॅटोमोबाईल, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट बाजारात प्रचंड उत्साह

नागपूर : मराठी नववर्षदिन आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जाणारा गुढीपाडव्यानिमित्त विविध बाजारपेठा सजल्या आहे. सराफा, आॅटोमोबाईल, गृहोपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स, रिअल इस्टेट क्षेत्रात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. व्यापाºयांनी शोरूमही पारंपरिक पद्धतीने सजविल्या आहेत. सर्वच बाजारपेठांमध्ये विविध आॅफर्सची रेलचेल आहे. या शुभमुहूर्तावर खरेदीसाठी नागरिक सज्ज आहेत. गुढीपाडव्याला सर्वच बाजारपेठांमध्ये २०० कोटींची उच्चांकी उलाढाल होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली. 

गुढीपाडव्यानिमित्त सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स, दुचाकी, चारचाकी यांच्यासोबतच घरखरेदी आणि रियल इस्टेट, प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ग्राहकांचे प्राधान्य दिसून येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेतेही सज्ज झाले असून, वेगवेगळ्या सवलत योजना जाहीर झाल्या आहेत. शुभमुहूर्तावर सर्व बाजारपेठांमधील शोरूम सजल्या आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने आघाडीवर असून एलईडी टीव्ही, फ्रीज, एसी अशा विविध वस्तूंमध्ये गुंतवणूक होण्याचा अंदाज विक्रेत्यांना आहे. 

सराफ बाजारही सज्ज

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर थोडं सोने घेणे शुभ मानले जाते. या पार्श्वभूमीवर सराफ बाजार सज्ज झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर ६० हजार रुपयांवर गेले आहेत. नागपूर सराफा असोसिशननचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. ग्राहकांच्या आवडीनुसार आकर्षक व अनोख्या डिझाईनचे नेकलेस, रिंग, बांगड्या, अंगठी, ब्रेसलेट, नेकलेस, लॉकेट यांच्यासोबतच सुवर्ण नाणी घेण्यास ग्राहक प्राधान्य राहील. या दिवशी सराफा बाजारात कोट्यवधींच्या उलाढालीची अपेक्षा आहे.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाnagpurनागपूरShoppingखरेदी