शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

राजच्या मारेकऱ्याला फाशी द्या : संतप्त नागरिकांचा पोलिसांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 20:45 IST

Raj kidnapping murder case निरपराध राज ऊर्फ मंगलू राजकुमार पांडे या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद शनिवारी हिंगणा तालुक्यात उमटले. राजच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच फास्ट ट्रॅक न्यायालयात या घटनेचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घेराव केला.

ठळक मुद्देएमआयडीसी परिसरातील अवैध धंदे बंद करा

 लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : निरपराध राज ऊर्फ मंगलू राजकुमार पांडे या पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद शनिवारी हिंगणा तालुक्यात उमटले. राजच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच फास्ट ट्रॅक न्यायालयात या घटनेचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी करीत संतप्त नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना घेराव केला. एमआयडीसी परिसरात गेल्या काही वर्षांत अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. यातूनच अशात घटनांत वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.गुरुवारी सायंकाळी इंदिरानगरातील राज पांडे या मुलाला शेजारी राहणाऱ्या आरोपी सूरज शाहूने मोटरसायकलवर बसवून हुडकेश्वर भागातील जंगलात नेऊन त्याची हत्या केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. एमआयडीसी परिसरात राजरोसपणे चालणारी अवैध दारू-गांजा विक्री, सट्टापट्टी तातडीने बंद करण्यात यावी. अवैध धंदे चालविणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.पं.स.सदस्य आकाश रंगारी, उपसरपंच कैलास गिरी, सुरेश कालबांडे, ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे, बंडू भोंडे यांच्या उपस्थितीत मृतक राजचे वडील राजकुमार व आई गीता पांडे यांच्यासह वस्तीतील शंभरहून अधिक महिला व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. या प्रकरणाचा तपास योग्य रीतीने व्हावा या मागणीचे निवेदन सहायक पोलीस आयुक्त परशुराम कार्यकर्ते यांना याप्रसंगी देण्यात आले. एमआयडीसी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी इंदिरानगरसह इतर भागांत पोलीस पेट्रोलिंग वाढवावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विनोद ठाकरे यांनी केली.

टॅग्स :agitationआंदोलनMIDCएमआयडीसीPolice Stationपोलीस ठाणे