शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

शिक्षिकेला जाळणाऱ्या आरोपीला फासावर लटकवा : निवेदनाद्वारे केली सुरक्षेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 10:07 PM

हिंगणघाट येथे भरदिवसा शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटविण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी न्यायात विलंब होऊ नये म्हणून प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला थेट फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देमहिला संघटनांनी केला घटनेचा निषेध

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : हिंगणघाट येथे भरदिवसा शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटविण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी न्यायात विलंब होऊ नये म्हणून प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला थेट फासावर लटकविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मंगळवारी विविध महिला संघटनांनी याबाबत निवेदन सादर केले.राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ तसेच शहर महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली. एका शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर अशाप्रकारे अमानुष हल्ला झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बलात्कार असो किंवा अ‍ॅसिड हल्ला, महिलांना वारंवार अत्याचाराचा सामना करावा लागतो. पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न हा त्यातलाचा प्रकार असून सातत्याने महिला, मुली विकृत मानसिकतेच्या बळी ठरत आहेत. त्यामुळे शासन, पोलीस प्रशासन आणि महिला संघटनांच्यावतीने संयुक्तपणे उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यालय व मुलींचे महाविद्यालय, वसतिगृह अशा ठिकाणी पोलीस बंदोबस्त, पेट्रोलिंग गस्त ठेवणे आणि प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये संतापाची लाट आहे. गंभीर जखमी असलेल्या पीडित शिक्षिकेला त्वरित न्याय देण्याची गरज आहे. न्यायास उशीर झाल्यास न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडेल अशी भीती संघटनांनी व्यक्त केली. त्यामुळे त्वरित खटला चालवून न्याय देण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना व त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देण्यात आले. यावेळी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रज्ञा बडवाईक तसेच संगीता उपरीकर, अर्चना सिडाम, सुनिता जिचकार, ज्योती ढोके, अ‍ॅड. शितल शुक्ला, शालिनी सरोदे, नलिनी करांगळे, कविता हिंगणकर, सुजाता सरनाईक, बेबीताई गाडेकर तसेच ओबीसी महासंघाच्या कल्पना मानकर, नंदा देशमुख, लक्ष्मी सावरकर, रेखा बाराहाते, वृंदाताई ठाकरे, नयना झाडे, निर्मला मानमोडे, विजया धोटे, प्रांजली ताल्हन, सुषमा साबळे, माया घोरपडे, साधना बोरकर, वर्षा भोयर, मंगला अल्लरवार, मीरा मदनकर, पूर्णिमा कारोळे, राणी साबळे, स्नेहल बोरकर आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Womenमहिलाagitationआंदोलन